आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रिसिजन गप्पा,अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी उलगडला दिग्दर्शन प्रवास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - अभ्यासक्रमात इतिहास हा विषय ऐच्छिक म्हणून घेतला जातो. पाठांतर करून त्याचा पेपर सोडवला जातो. पण हाच इतिहास रंजकपणे सांगितला तर त्यात रूची निर्माण होईल. ही बाब हेरूनच ऐतिहासिक चित्रपटांची संकल्पना पुढे आली. त्यातूनच जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर, रमाबाई आंबेडकर यांच्या भूमिका स्वत: साकारल्या. काही कथा लिहीत राहिले. त्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना वाचून दाखवल्या. त्यांनी दुजोरा दिला आणि दिग्दर्शनात प्रवेश झाला. ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांपुढे आणले, अशी माहिती अभनिेत्री मृणाल कुलकर्णी यांनी शनिवारी येथे दिले.

प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने आयोिजत ‘प्रिसिजन गप्पा’ कार्यक्रमात त्यांची प्रकट मुलाखत झाली. स्वामी मालिकेतील ‘रमा’पासून रमा-माधव चित्रपटापर्यंतचा प्रवास त्यांनी सांगितला. अॅड. आनंद देशपांडे यांनी मुलाखत घेतली.