आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर - गेल्या दहा वर्षांत नैसर्गिक प्रसूतीपेक्षा सिझेरियन होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. महिलांची बदलती जीवनशैली याला कारणभूत असल्याचे कारण पुढे केले जात आहे. शिवाय, वैद्यकीय क्षेत्रात शिरलेली व्यावसायिकताही यामागील कारण मानले जाते. वाढत्या सिझेरियनला व्यावसायिक डॉक्टरांप्रमाणेच अतिसुशिक्षित पालक हेही जबाबदार आहेत. रिस्क नको म्हणून गरज नसताना ते सिझेरियनवर भर देतात. साधारणत: नॉर्मल बाळतंपणासाठी 10 हजार रुपयांच्या आसपास खर्च येतो. सिझेरियन म्हटले की हा खर्च 30 हजार रुपयांपर्यंत पोहोचतो. शासकीय रुग्णालयांपेक्षा खासगी रुग्णालयांत सिझेरियनचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे. या विषयावर ‘डीबी स्टार’ने टाकलेला प्रकाश..
जानेवारी 2009 ते नोव्हेंबर 2013 पर्यंत खासगी रुग्णालयांत एकूण 6542 सिझेरियन करण्यात आल्याची नोंद महापालिका आरोग्य विभागाकडे आहे. मागील सहा वर्षांपूर्वीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास हेच प्रमाण 2330 च्या आसपास असल्याचे दिसून येत. याचाच अर्थ ही संख्या मागच्या पाच वर्षाचा विचार केल्यास तिपटीने वाढली आहे. याउलट मनपा व शासकीय रुग्णालयात याचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते. खासगी रुग्णालयांतील सिझेरियनचे वाढते प्रमाण चिंताजनक असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.पण,यावर
कशामुळे होते सिझेरियन
बाळंतपण हा स्त्रीचा पुनर्जन्म असतो. सर्व कुटुंबाची नजर माता आणि बाळावर केंद्रित झालेली असते. बाळंतपण सुखरूप होण्याची सर्वांना आशा असते. अशावेळी कंडिशन क्रिटिकल असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर सुरू होते धडपड. सिझेरियनशिवाय कोणताच पर्याय राहत नाही. अशावेळी नेमकी समस्या काय आहे, त्यावर सिझेरियन हा मार्ग किती महत्त्वाचा आहे हे पटवूनदेण्याऐवजी लवकर निर्णय घ्या वेळ नाही, असा दबाव कुटुंबावर आणला जातो. त्यामुळे बर्याचदा गडबडीत निर्णय घेतले जातात
वैद्यकीय पेशाची बदनामी
असे प्रकार सोलापुरात घडतात असे वाटत नाही. अशा प्रकरणी दोषींवर योग्य ती शिक्षा होणे गरजेचे आहे. त्यामुळे चांगल्या पद्धतीने काम करणार्या डॉक्टरांच्या नावांची बदनामी होते. हकनाक सिझेरियन करणे हे धोक्याचेच आहे. त्यात एखाद्या रुग्णांचा जीव गेला तर त्याचे परिणाम भोगण्याची तयारी त्यांनी ठेवावी. डॉ. सुवर्णा बासुतकर, स्त्रीरोग संघटना अध्यक्ष
मुहूर्त जपण्याची प्रथा
विशिष्टदिनी किंवा काही शुभ मुहूर्तावरच बाळंतपण केले जाण्याची मागणी केली जाते. त्यात 15 ऑगस्ट (स्वातंत्र्यदिन), 26 जानेवारी (प्रजासत्ताकदिन), त्याचबरोबर पाडवा, दिवाळी अशा सणांच्या दिवशीच माझे बाळ जन्माला यावयास हवे यासाठी अनेक जोडपी आग्रह धरतात. त्यामुळे अनेकदा प्रीमॅच्युअर किंवा पोस्ट मॅच्युअर डिलिव्हरी केली जाते.
बदलती जीवनशैली
सिझेरियनच्या वाढत्या प्रमाणाला महिलांची बदलती जीवनशैलीही तेवढीच कारणीभूत आहे. अलीकडे विभक्त कुटुंब पद्धतीत कामाचे प्रमाण कमी झाले आहे.त्याचाच परिणाम बाळंतपणावेळी होतो. कळा न येणे अथवा अचानक रक्तदाबाचा त्रास होणे अशी आणखी बरीच कारणे निर्माण होतात आणि परिस्थिती बिघडत जाते. त्यातून सिझेरियनशिवाय पर्याय राहत नाही.
.. तर चुकीचे ठरेल
वैद्यकीय क्षेत्रात सर्वच व्यावसायिक लोक नसतात. काही डॉक्टर स्वखर्चानेही बाळंतपणाचा भार उचलतात. सोलापुरात जर असे काही घडत असेल. काही डॉक्टर सामान्य रुग्णांना लुबाडत असतील तर हे चुकीचे आहे. डॉ. प्रसाद कुमार, आरोग्य अधिकारी मनपा
शासकीय रुग्णालयात नॉर्मलला महत्त्व
खासगी रुग्णालयांच्या तुलनेत महापालिका आणि जिल्हा रुग्णालयांत बाळंतपण नॉर्मल करण्यासाठी अधिक प्रयत्न केले जातात. कितीही क्रिटिकल प्रसंग निर्माण झाला तरी रुग्ण व नातेवाईकांना धीर दिला जातो. परिस्थिती आटोक्याबाहेर गेल्यानंतरच सिझेरियनचा निर्णय घेतला जातो. या रुग्णालयांत महिलांच्या प्रसूतीचा सबंध खर्च शासन करते. त्यामुळे ती एक नैतिक जबाबदारी कर्मचार्यांवर असते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.