आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे अन् बस स्थानकावर लवकरच सुरू होणार प्रीप्रेड रिक्षा सेवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - रिक्षाचालकांकडून सामान्य प्रवाशांची होणारी आर्थिक लूट आता थांबणार आहे. कारण, सोलापूर आरटीओ प्रशासनाच्या पुढाकाराने आता सोलापुरातील रेल्वे आणि बसस्थानकावर प्रवाशांच्या सेवेसाठी प्रीपेड रिक्षा स्टॅन्ड उभारले जाणार आहे. पुणे रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षाचे प्रीप्रेड स्टॅन्ड उभारले गेले आहे. त्याच पद्धतीचे प्रीपेड रिक्षा स्टॅन्ड आता सोलापुरात असणार आहे. प्रवाशांना बस स्थानकावरून अथवा रेल्वे स्थानकावरून ज्या ठिकाणी जायचे आहे त्याचे ितकीट प्रवाशांना रिक्षात बसताना दिले जाणार आहे. या ितकिटावर रिक्षा क्रमांक, रिक्षा चालकाचे नाव त्याचे दर असणार आहे.

रिक्षाचालक हे अनेकदा नियमित दरापेक्षा अतिरिक्त पैसे घेतात. परगावच्या प्रवाशांना याचा मोठा फटका बसतो. प्रवाशांची होणारी लूट थंाबावी यासाठी सोलापूर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने सोलापूर रेल्वे स्थानकावर मध्यवर्ती बसस्थानकावर प्रीपेड रिक्षा स्टॅन्ड उभारले जाणार आहे. यासाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी पुण्यातील सॉप्टवेअर कंपन्यांशी चर्चा केली आहे. लवकरच ही सुविधा सुरू होणार आहे.रिक्षा चालकांना अतिरिक्त भाडे आकारता येणार नाही. बुथवर सांगण्यात आलेल्या पत्त्याच्या आधारे प्रवाशांना संगणकीकृत ितकीट दिले जाईल. त्यावर रिक्षा भाड्याचा उल्लेख असेल.

प्रवाशीहित
^येत्या आठवडयाभरात बस रेल्वे स्थानकावरील रिक्षा स्टॅन्डवर प्रीपेड सेवा सुरू करण्यात येईल. पुण्यातील सॉप्टवेअर कंपन्यांशी चर्चा झाली. त्याला लवकरच मूर्त स्वरूप येईल. दीपकपाटील, आरटीओ

^प्रवाशांचा रिक्षा चालकांवरचा विश्वास उडत चाललेला आहे. त्यासाठी ही सेवा चांगली आहे. त्यात प्रशासनाची चांगला सहभाग हवा. ही सेवा निरंतर रहावी. सलीममुल्ला,सचिव, लालबावटारिक्षा चालक संघटना,

पावतीवर रिक्षा चालकाचे नाव रिक्षाचा क्रमांक असल्याने एखाद्या प्रवाशाची तक्रार असल्यास ते आपली तक्रार आरटीओकडे नोंदवू शकणार आहे.
प्रीपेड रिक्षा स्टॅन्डचे असे असतील फायदे
सीसीटीव्ही कॅमेरा लावणार
प्रीपेडबूथच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांची अोळख पटण्यासदेखील मदत होणार आहे. एखाद्या संशयिताला पकडण्यासाठीही याचा उपयोग होईल.

आधीही प्रयत्न
२००९ते २०१० दरम्यान पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय, रेल्वेचे नरेंद्र पाटील आरटीओ राजेंद्र मदने या तत्कालीन अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने प्रीपेड रिक्षा सुरू करण्यात आली होती. थोड्याच दिवसात या ितन्ही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आणि प्रीपेड सेवाही.

गुगल मॅपने मोजणार अंतर
प्रीपेडबूथवर सॉप्टवेअर बसवण्यात येईल. प्रवाशाने ठिकाण सांगल्यावर गुगल मॅपने अंतर काढले जाईल. त्या अंतराचे होणारे भाडे लागलीच संगणकावर येईल. येणाऱ्या भाड्याची कल्पना प्रवाशांना देण्यात येईल. प्रवाशी ते भाडे देण्यास इच्छुक असल्यास त्याला तिकीटमिळेल.