आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश अर्ज स्वीकृतीची मुदत संपली, २१ पर्यंत छाननी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पूर्वप्राथमिक प्राथमिक वर्गातील सर्वसाधारण कोट्यातील प्रवेेशासाठी अर्ज स्वीकृतीची मुदत गुरुवारी संपली. प्राप्त अर्जांची छाननी प्रक्रिया २१ एप्रिलपर्यंत होणार आहे, अशी माहिती महापालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी विष्णू कांबळे यांनी दिली. २३ एप्रिल ते २७ एप्रिल प्रवेश प्रक्रिया असणार आहे, तर ३० एप्रिल ते मे दरम्यान प्रक्रियेची दुसरी फेरी आहे.

सीबीएससी ३६६ तर स्टेटच्या ३९० अर्जांची विक्री झाली असून सीबीएससी ३१९ तर स्टेटसाठी ३४० अर्ज स्वीकृत झाल्याचे इंडियन मॉडेल स्कूलचे संचालक अमोल जोशी यांनी सांगितले. जाहीर वेळापत्रकानुसार प्राथमिक वर्गातील प्रवेश प्रक्रिया सुरू राहील. सेंट जोसेफचे प्राचार्य डिसुझा यांनी ११६० अर्जांची विक्री झाल्याचे सांगितले.

फोटो - सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये प्रवेश प्रक्रियेवेळी प्राचार्य सिमन डिसुझा.
बातम्या आणखी आहेत...