आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prime Minister Narendra Modi,Latest News In Divya Marathi

सोलापूरकरांच्या प्रेमाला शत शत नमन- पंतप्रधान नरेंद्र मोदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- तीन महिन्यांपूर्वी मी सोलापुरात आलो होतो, सोलापूरकरांचा तो उत्साह आजही काही कमी झालेला नाही. या प्रेमाबद्दल शत शत नमन. सोलापूरने मला आपलेसे केल्याची ही पावती आहे. कमी वेळेत मला दुसर्‍यांदा सोलापुरात येण्याची संधी मिळाली. सोलापूरकरांचे प्रेम वाढतेच आहे, या प्रेमाची परतफेड मी विकासरूपी व्याजासह परत करेन.असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
टेक्स्टाइल रोजगार देणारा उद्योग : टेक्स्टाइल हा सोलापूरचा मुख्य उद्योग आहे. ती सोलापूरची ओळख आहे. या क्षेत्रात नवनवीन प्रयोग करून तो वाढविण्याची गरज आहे. सोलापूरच्या या उद्योगाला त्यात वाव मिळाला नाही. सर्वाधिक रोजगार देणारा हा उद्योग आहे, तरुणांना रोजगार देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. युवकांची क्षमता वाढवून, त्यांच्यात कौशल्य निर्माण करून सार्मथ्यशाली बनविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. त्यामुळे राष्ट्र समृद्ध होईल.
खासदारांची झाली पायपीट : होम मैदानाकडे जाणार्‍या रस्त्यांवर सुरक्षितेसाठी पोलिसांनी अगदी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. बॅरीकेटस् लावून ते बंद केले होते. याचा फटका नागरिकांनाच नाही तर तिन्ही खासदारांसह अनेक व्हीआयपींना बसला. दुपारी साडे तीनच्या सुमारास एकापाठोपाठ तिन्ही खासदार रंगभवन चौकाजवळ दाखल झाले. त्यांना आपले वाहन तेथेच सोडून चालत जावे लागले. यात सगळ्यात पहिले आलेले उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड, माढय़ाचे विजयसिंह मोहिते आणि सोलापूरचे अँड. शरद बनसोडे यांचा समावेश होता.
कागद, पेनचा खच पडला : सभेसाठी जिल्ह्यातून मोठय़ा प्रमाणात र्शोते आले होते. त्यांना सिद्धेश्वर मंदिराच्या बाजूने प्रवेश देण्यात येत होता. पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न देता येणार्‍या प्रत्येकाची तपासणी करीत त्यांच्याकडील कागद, रुमाल व पेन काढून टाकण्यास सांगण्यात आले. लोकांना नाईलाजाने आपले पेन व रुमाल प्रवेशद्वारातच टाकून आत जावे लागले, तिथे रुमालांचा व पेनाचा ढीग साचला होता. यातून काही पत्रकारदेखील सुटले नाहीत.
पोलिसांचा वॉचटॉवर : पोलिसांनी होम मैदान परिसरातल्या उंच इमारतीवरदेखील बंदोबस्त ठेवला होता. हरिभाई, ज्ञानप्रबोधिनी, नॉर्थकोटची इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय आदी ठिकाणी पोलिसांची नेमणूक होती.
व्हीआयपी कक्षात आजी, माजी खासदार, आमदार : व्यासपीठावर सोलापूरचे खासदार शरद बनसोडे हे एकटेच होते, तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्ग फडणवीस, खासदार विजयसिंह मोहिते, रवींद्ग गायकवाड, सांगलीचे संजय पाटील, सुभाष देशमुख यांनाही व्हीआयपी कक्षातच बसावे लागले. आमदार विजय देशमुख, सिद्गामप्पा पाटील, ओमराजे निंबाळकर, निशिगंधा माळी, पुरुषोत्तम बरडे, मनपाचे आयुक्त चंद्गकांत गुडेवार आदी व्हीआयपी कक्षात बसून होते.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणात अडथळे
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण भाषणासाठी उभे राहिल्यानंतर त्यांना बोलू द्यायचे नाही, यासाठी कार्यकर्त्यांनी आरडा-ओरडा सुरू केला. बोलू नका असे हातवारे करीत मोदी, मोदी अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. स्वत: मोदी आणि नितीन गडकरी हे शांत राहण्याचे आवाहन करीत होते, पण कार्यकर्त्यांच्या घोषणा स्रुूच होत्या अन् मुख्यमंत्र्यांचे भाषणही.
मुख्यमंत्र्यांनीही टाळला शिंदेंचा नामोल्लेख
पॉवरग्रीड, सोलापूर-पुणे महामार्ग, सोलापूर-धुळे महामार्ग हे प्रकल्प तत्कालीन ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी विशेष लक्ष घालून मंजूर करून आणले होते. त्याची कामेही आता अंतिम टप्प्यात आहेत. त्यातील पॉवरग्रीडचे आणि सोलापूर-पुणे महामार्गाचे आज नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या कार्यक्रमात हे प्रकल्प सुरू केल्याबद्दल शिंदे यांचा मुख्यमंत्री चव्हाण यांनीही उल्लेख केला नाही. पंतप्रधानांसह अन्य नेत्यांनीही तो टाळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दुपारी होम मैदानावर सोलापूरकरांना संबोधित केले. तीन महिन्यांपूर्वी या मैदानावर श्री. मोदी यांची प्रचार सभा झाली होती. तेवढाच उत्साह पंतप्रधानपदावरील श्री. मोदींना ऐकण्यासाठी दिसून आला.