आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prime Minister Narendra Modi,Latest News In Divya Marathi

सोलापूरला पोलिस छावणीचे स्‍वरूप, स्ता एका तासासाठी थांबतो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात येणार असल्यामुळे विमानतळ ते होम मैदान या संपूर्ण मार्गावर पोलिस छावणीचे स्वरूप होते. मुख्य रस्त्याला येऊन मिळणारे रस्ते जागोजागी अडथळे तयार करून बंद केले होते. पावलागणीक पोलिस, एका मिनिटात किमान चार-पाच पोलिस पथकाकडून तपासणी, चौकशी, सूचना देणे सुरूच होते. सकाळपासून रस्त्यावर तुरळक गर्दी होती. दुकानेही जवळपास सायंकाळ सहापर्यंत बंदच होती. दुपारी तीन ते चार हा एकतास मात्र संपूर्ण वाहतूकच बंद ठेवल्यामुळे रस्ता निर्मुनष्य झाला. नरेंद्र मोदींना पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा महिला, तरुणी, लहान मुले, नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. हातात तिरंगा घेऊन लहान मुले र्शी. मोदींचा वाहन ताफा जाताना त्यांना हात उंचावत शुभेच्छा देताना अनेकांच्या चेहर्‍यावर उत्साह दिसून आला.
मोदी यांना पाहण्यासाठी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक पाहण्यासाठी अनेक तरुण, नागरिक भिंतींवर, गच्चीवर थांबले होते. हत्तुरेवस्ती, मजरेवाडी, आसरा, जुना होटगी नाका, सातरस्ता, जुना एम्प्लॉयमेंट चौक भागातही अनेक नागरिक गच्चीवर व चौकात थांबले होते. मोदींचे हेलिकॉप्टर पाहण्यासाठी गर्दी होती. टेकऑफ घेतल्यानंतर हात उंचावून शुभेच्छा देत होते. रस्त्यावरून ताफा जाताना मोदीही हात जोडून नागरिकांना अभिवादन करीत होते. तरुण घोषणा देत होते.
पोलिसांचे नेटके नियोजन
अनेक वर्षांनंतर पोलिस बंदोबस्ताची कडक शिस्त सोलापूरकरांना पाहायला मिळाली. स्थानिक पोलिस अधिकारी, दिल्ली, मुंबईचे वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी बंदोबस्ताचे नियोजन केले होते. मोदींचे हेलिकॉफटर टेक ऑफ घेताच पोलिसांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.
वाहतूक कोंडी, संताप
सकाळी अकरापासून डफरीन ते रंगभवन हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला. दुपारी तीन ते चार तासभर होटगी रस्ता बंद होता. सायंकाळी पुन्हा पाच ते साडेपाच रस्ता बंद. सिटीबस, रिक्षा काही काळ बंद असल्यामुळे प्रवासी, नागरिकांचे हाल झाले. सायंकाळी साडेसहानंतर मात्र अवजड वाहनांची प्रचंड कोंडी झाली.