आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खासगी शिकवणी घेणार्‍यांवर कडक कारवाई करणार- जिल्हाधिकारी डॉ. गेडाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाविद्यालयात कायम सेवेत असूनही बेकायदेशीरपणे खासगी शिकवणी घेणार्‍या शाळांवर व शिक्षिकांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनकडून जिल्हा परिषदेसमोर उपोषण करण्यात आले. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांना निवेदन देण्यात आले असून कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी दिली.

बालकांच्या शिक्षणाचा हक्क 2009 कलम 28 व महाराष्ट्र खासगी शाळा कर्मचारी नियम 23 अन्वये कोणत्याही शिक्षकास खासगी शिकवणी घेण्यास, खासगी शिकवणी वर्गात शिकवण्यास, खासगी अध्यापन कृतीमध्ये भाग घेण्यात प्रतिबंध आहे. तरीही काही शिक्षक शिकवण्या घेत आहेत. शासनाच्या तरतुदींचा भंग करणार्‍या शिक्षकांवर, सेवा शर्तीच्या भंगाबाबत व्यवस्थापनाने शिस्तभंगाची कारवाई करावी, असा नियम आहे. अनुदानित शिक्षणसंस्थेच्या त्यांच्याविरुद्ध तसेच त्यांना पाठीशी घालणार्‍या व्यवस्थापनाविरोधात कठोर कायर्वाही करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. याबाबत वारंवार शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र, अद्याप कारवाई झालीच नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. जिल्ह्यातील अशा प्रकारच्या शिकवण्यावर त्वरित कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही जगताप यांनी दिला आहे.

14 शाळांमधील शिक्षक घेतात शिकवण्या
जिल्ह्यातील 14 शाळांमध्ये शिकवण्या घेण्याचे प्रकार चालू आहे. यामध्ये बार्शी तालुक्यातील 10 शाळांचा समावेश असून 30 शिक्षकांचा समावेश आहे. तर कर्नाटक लिंगायत एज्युकेशन लिंगायत (बेळगाव) शाळा, यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ (करमाळा), रयत शिक्षण संस्था (उपळे, उस्मानाबाद) आणि जिल्हा परिषद असे प्रत्येकी एका शिक्षकांचा समावेश आहे.