आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prof. Dr. Dattaprasada Dabholkar Speak At Solapur

समाजाला गाळातून बाहेर काढायचंय - प्रा. डॉ. दाभोळकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - विविध जोखडात आणि गाळात रुतलेल्या समाजाला बाहेर काढायची माझी इच्छा आहे. त्यासाठीच मी बाहेर पडलो, अशा विचारांनी प्रेरित झालेल्या स्वामी विवेकानंदांचा जीवनपट प्रा. डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी आपल्या व्याख्यानातून उलगडला.

मागील दोन दिवसांपासून शिवछत्रपती रंगभवन येथे आयोजित ‘स्वामी विवेकानंद : एक आकलन’ या व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते.

आज समारोपाच्या दिवशीही त्यांनी विविध गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले, ‘स्वामी विवेकानंद हे महामानवच होते. ते नीटपणे समजावून घेणे ही काळाची गरज आहे. स्वामी विवेकानंदांना काय करायचे होते ते त्यांनी त्याकाळी स्पष्टपणे सांगितले होते. मी साधू नाही, संत नाही, मी गरीब आहे. मला गरिबांच्याबद्दल प्रेम वाटते आणि दारिद्र्य, अज्ञान, रूढी, परंपरा यांच्या गाळात रुतून राहिलेल्या २० कोटी हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन भारतीयांना त्या गाळातून बाहेर काढणे हे माझे कार्य आहे, असे ते म्हणत होते. माझे हे बांधव त्याकालीन राजवटीत भयानक चिरडले गेले. त्यामुळे ते स्वत:चे स्वत्व विसरून गेले. आता त्यांना मला त्यांचीच ओळख त्यांना करून द्यावी लागेल. नोव्हेंबर १८९६ च्या पत्रात मी समाजवादी आहे आणि समाजवादी माणूस धर्मचिकित्सा करतो, तशी त्यांनी केलेलीही आहे.’

‘आपले देव आता जुने झालेत. आपल्याला नवा देव, नवा धर्म आणि नवा वेग हवाय. कारण आपल्याला नवा भारत घडवायचा आहे. यासाठी जातीय व्यवस्था मोडली आणि दलितांना पुढे आणण्यासाठी १०० टक्के आरक्षणही द्यावे लागेल. त्यांच्यासाठी चांगल्या शिक्षणांची सोय करावी लागेल. ब्रिटिशांनी राज्य द्यावे, ही आपली इच्छा होती पण गुलामांना इतरांना गुलाम करण्यासाठी राज्य हवे असते, हेही तितकेच सत्य आहे, असा उल्लेख १७ नोव्हेंबर १८९४ च्या पत्रात आहे. सर्वधर्म परिषदेच्या दीड महिन्यांनी २८ डिसेंबर १८९३ ला त्यांनी आपल्या मित्राला एक पत्र लिहिले. त्यात ते म्हणतात, मी केवळ धर्म सांगायला, कुतूहल म्हणून आणि नाव मिळवायला परदेशात आलो नाही. माझ्या मनात जी रचना आहे, ती शोधण्यासाठी मी आलोय, असे म्हणतात. माझ्या मनातील रचना मी इतक्यात सांगणार नाही,’ अशा एक ना अनेक स्वामीजींच्या घटनांवर आधारित पत्र किस्से यावर दाभोलकर यांनी सविस्तर विवेचन केले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. परिवर्तन अकादमी सहकारीतर्फे याचे आयोजन करण्यात आले होते.