आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Profeesors Agitation : Today Meeting With The Higher Education Minister In Mumbai

प्राध्यापकांचे आंदोलन; आज मुंबईत उच्च शिक्षणमत्र्यांबरोबर बैठक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - राज्यभरातील प्राध्यापकांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या असहकार आंदोलनामुळे अनेक विद्यापीठांच्या परीक्षा लांबणीवर गेल्या आहेत. प्राध्यापकांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी उच्च शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी उद्या (सोमवारी) बैठक बोलावली आहे. तीत निर्णय होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एम. फुक्टोच्या नेतृत्वाखाली गेल्या 41 दिवसांपासून राज्यातील प्राध्यापकांनी असहकार आंदोलन पुकारले आहे. सोलापूर विद्यापीठामधील ‘सुटा’ ही संघटनांही आंदोलनात सहभागी आहे. यामुळे सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा अद्याप सुरू होऊ शकलेल्या नाहीत. यामुळे विद्यापीठाचा, विद्यार्थ्यांचा आणि पालकांचाही जीव टांगणीला आहे. यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी उच्च शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी मुंबईत एक बैठक बोलावली आहे.

यापूर्वी शासनाच्या प्रतिनिधींसोबत एम.फुक्टो संघटनेच्या बैठका झाल्या आहेत. अद्याप तोडगा न निघाल्याने परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

सोलापूर विद्यापीठाचे परीक्षा नियंत्नक डॉ. दादासाहेब साळुंखे म्हणाले, शासन स्तरावर या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी प्रय} सुरू आहेत. मात्न असहकार आंदोलनामुळे विद्यापीठ परीक्षांबाबत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा स्थितीत आंदोलन समाप्त झाल्यानंतर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर सुधारित वेळापत्नक जाहीर करण्यात येणार आहे.