आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शारदोत्सवात फुलणार आविष्कार, भगिनी समाजाचा उपक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- भगिनी समाजाच्या वतीने शारदोत्सवाचे आयोजन 7 ऑक्टोबर रोजी केले आहे. या निमित्ताने महिलांच्या कलागुणांचे आविष्कार पाहावयास मिळणार आहेत. यात प्रामुख्याने एकल नृत्य, समूहगीत, समूहनृत्य, विनोदी लघुनाटिका आदी कलाप्रकारांचे सादरीकरण होणार आहे, अशी माहिती समाजाच्या अध्यक्षा प्रीती वाघ यांनी दिली.

सकाळी अकरापासून छत्रपती रंगभवन सभागृह येथे कार्यक्रम होतील. आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होईल. बक्षीस वितरण लेखिका लक्ष्मीकमल गेडाम यांच्या हस्ते होईल.

कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर महोत्सवातील कार्यक्रमाची सुरुवात एकल नृत्याने होईल. युगल नृत्यानंतर विनोदी लघुपटाचे सादरीकरण होईल. त्यानंतर शेवटी समूहनृत्याचे सादरीकरण होईल. ओढणीच्या संकल्पनेवर समूहनृत्य असावे. युगल नृत्यासाठी अभिनेता राजेश खन्ना यांच्या चित्रपटातील गीतांवर आधारित नृत्य असावे. विनोदी लघुनाटिकेतही दोन स्त्री पात्र असलेले कोणत्याही नात्याचे ‘नाते तुझे माझे प्रेमाचे’ अपेक्षित आहे. गेल्या 75 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या भगिनी समाजातर्फे महिलांसाठी कार्यक्रम आयोजित केले जातात. माहितीसाठी 9922767679, 9960010414 किंवा 9665674807 या क्रमांकावर संपर्क साधावा.