आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बेदाणा निर्मितीसाठी प्रकल्पाची सुरूवात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापुरात बेदाणा सौदा सुरू झाल्यानंतर उत्पादकांच्या सोयीसाठी येथील कृषी उद्योजक जवाहरलाल मुनोत यांनी सुधारित बेदाणा प्रकल्प सुरू केला आहे. त्यांच्या हिरज (ता. उत्तर सोलापूर) येथील शेतात एक एकरवर हा प्रकल्प सुरू झाला. त्याला बँक ऑफ इंडियाने अर्थसाहाय्य केले. बँकेचे विभागीय व्यवस्थापक मुकुल कुमार र्शीवास्तव यांनी बुधवारी त्याचे उद्घाटन केले.

प्रकल्प नवी दिल्लीच्या राष्ट्रीय फलोद्यान मंडळाकडून अनुदानास पात्र असल्याचे सांगत र्शी. मुनोत म्हणाले, ‘‘उत्पादित द्राक्षांपासून अत्यंत कमी कालावधीत उत्तम प्रतीचा बेदाणा मिळतो. अत्याधुनिक उपकरणांद्वारे प्रक्रिया होत असल्याने निर्यातक्षम बेदाणा तयार होतो.’’ या वेळी मुख्य व्यवस्थापक गौरीशंकर राव, अग्रणी शाखेचे व्यवस्थापक माधव कोरवार, लक्ष्मण देसाई, रवी देशपांडे, अजित डोके, द्राक्ष बागायतदार शंकर येणेगुरे, आशिष काळे, सकलेश लिगाडे आदी उपस्थित होते.


असा आहे प्रकल्प
चांगल्या आणि दुय्यम द्राक्षांची वर्गवारी होते
तासाला तीन टन बेदाण्याची निर्मिती होते
हंगाम काळात 300 टन उत्पादन होणार
प्रत्यक्ष,अप्रत्यक्षरीत्या 20 जणांना रोजगार

प्रक्रिया उद्योग उभारा
शेतकर्‍यांचा उत्पादित माल बाजारात एकदम आल्यास दर कोसळतात. त्यामुळे आर्थिक नुकसान होते. हे टाळण्यासाठी शेतमालावर प्रक्रिया करणार्‍या उद्योगांची नितांत गरज आहे. अर्थसाहाय्यासाठी तत्पर आहे.’’ मुकुलकुमार र्शीवास्तव, मुख्य व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया


शेतकर्‍यांच्या सोयीसाठी
शेतातून 20 टन द्राक्षांचे उत्पादन घेतले. त्याचा बेदाणा करण्याचा निर्णय घेतला. परिसरातील शेतकर्‍यांचाही विचार करता, अत्याधुनिक बेदाणा प्रकल्प सुरू करण्याचे ठरवले. त्याला बँकेने मदतीचा हात दिला. जवाहरलाल मुनोत, प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक