आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मदर मिल्क बँकेसाठी राज्याकडे प्रस्ताव पाठवणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - आईच्या दुधापासून वंचित असणार्‍या सोलापुरातील बालकांना आता मदर मिल्क बँकेच्या माध्यमातून दुधाचे वरदान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या अमृतासाठी सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी व महापौर अलका राठोड या राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवणार आहेत.

ज्या मातांना अधिक दूध आहे अशांना या बँकेत दूध ठेवण्याची व ज्या बालकांना आईचे दूध मिळत नाही अशा बाळांना मदर मिल्क बँकेतून दूध मिळण्याची व्यवस्था करण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने डॉ. निशिगंधा माळी प्रयत्न करणार आहेत. महिला व बाल कल्याण विभागाच्या माध्यमाने मदर मिल्कचा प्रस्ताव स्थायी समितीच्या वतीने राज्य शासनाकडे पाठवला जाणार आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ‘दिव्य मराठी’ने स्तनपान सप्ताह साजरा केला होता. या पार्श्वभूमीवर महापौर व जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी हा निणर्य घेतला आहे. सोलापूरमध्ये मदर मिल्क बँकेची शासकीय स्तरावर स्थापना व्हावी यासाठी महापौर अलका राठोड यांनीही राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचे सांगितले. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि महापौर यांच्या प्रस्तावामध्ये मदर मिल्क बँकेची जागा, बजेट व यंत्रणा याचा उल्लेख असणार आहे.


प्रस्ताव पाठवणार
सोलापुरात मदर मिल्क बँक उभी राहवी यासाठी प्रस्ताव तयार करून तो राज्य शासनाकडे पाठवणार आहे. त्यासाठी वेगाने हालचाल करणार आहे. त्याच्या मंजुरीसाठीही पाठपुरावा जारी ठेवण्यात येईल.’’ अलका राठोड, महापौर, महापालिका


मध्यवर्ती ठिकाणी बँक
येणार्‍या स्थायी समिती सभेत मदर मिल्क बँकेचा प्रस्ताव ठेवणार आहे. त्यातून अनेक बालकांना आईचे दूध मिळणार आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ही मदर मिल्क बँक उभी करण्याचा प्रयत्न करणार आहे. डॉ. निशिगंधा माळी, अध्यक्ष, जिल्हा परिषद