आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महसूलचे कामकाज दिवसभर राहिले ठप्प, तहसीलदार मारहाणीच्या निषेधार्थ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- दुधनी(ता. अक्कलकोट) येथील फ्रुटीबार ऑर्केस्ट्राच्या (शांभवी) तपासणीसाठी गेलेल्या महसूलच्या पथकातील तहसीलदार गुरू बिराजदार यांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ सोमवारी जिल्ह्यातील पंधराशे अधिकारी कर्मचाऱ्यांनी महसूलचे सर्व कामकाज बंद ठेवले. काँग्रेसचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांचे बंधू शंकर म्हेत्रे यांनी शनिवारी रात्री तहसीलदार बिराजदार यांच्यासह दोन कर्मचाऱ्यांना मारहाण करून धक्काबुकी केली होती. म्हेत्रे यांना तातडीने अटक करून कारवाई करावी, अशी मागणी महसूल कर्मचारी संघटनेने केली आहे. जिल्ह्यातील अक्कलकोट, बार्शी, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, करमाळा, सांगोला, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर तहसीलमधील सर्व काम ठप्प राहिले.
चोवीस तासांत आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी महसूल संघटनेने बेमुदत कामकाज बंद ठेवले आहे. फ्रुटी बारमध्ये काही गोलमाल नसेल तर तपासणी का करू दिली नाही?
तहसीलदारांना गळा पकडून मारहाण करणे हे चुकीचे आहे. सध्या तहसीलदार गुरू बिराजदार हे अश्विनी रुग्णालयात उपचार घेत असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.
- विजय सिंह देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी
बातम्या आणखी आहेत...