आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरज १०४ घंटागाड्यांची, धावतात फक्त ५१, कचऱ्याचा प्रश्न कायम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सार्वजनिक स्वच्छतेपोटी महापालिका शहरातील प्रत्येक मिळकतदाराकडून दरवर्षी ५४८ रुपये कर संकलन करते, तर कचरा व्यवस्थापनासाठी दरमहा सुमारे सव्वाकोटी रुपये खर्च केले जातात. नाशिक,औरंगाबाद महापालिकांच्या कचरा व्यवस्थापनाच्या तुलनेत सोलापुरात अधिकचा खर्च करूनही शहर स्वच्छतेचा प्रश्न कायम आहे.

सोलापुरला 104 घंटागाड्याची गरज असताना केवळ 51 गाड्यांची सुविधा आहे. त्यामुळे पूर्ण कचरा संकलन होत नाही. आरोग्य निरीक्षक समीक्षा कन् स्ट्रकश्न एजन्सी यांच्यात समन्वय नसल्याने नागरीकांची ओरड चालूच आहे. कचरा व्यवस्थापन हे नागरी आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे. राजीव गांधी आरोग्य योजनेत राज्यात सर्वाधिक सोलापूरच्याच रूग्णांनी इलाज घेतला आहे. याचाच अर्थ सोलापूरच्या सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे. परंतु महापालिका प्रशासन तेवढ्या गंभीरतेने याकडे पाहत नाही.

औरंगाबाद महापालिकेने 2008 कचरा व्यवस्थापनासाठी खासगी एजन्सी नियुक्त केली होती. परंतु आरोग्य प्रश्न लक्षात घेऊन एजन्सीचा मक्ता रद्द करून मनपाने स्वत:च काम सुरू ठेवले आहे. सोलापुरातील कचरा व्यवस्थापनाचा वर्षभरातील लेखाजोखा पाहता खर्च वाढला, परंतु कचऱ्याचा प्रश्न तसाच आहे.

घंटागाड्या वाढवण्यासाठी मक्तेदारांना पत्र देणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडून काम करून घेण्यासाठी पाठपुरावा करत आहे.” डॉ.जयंती अडकी, मनपाआरोग्य अधिकारी

एक्स्पर्ट व्ह्यू
आम्ही१२ गाड्यांवर २००१ पर्यंत शहरातील संपूर्ण कचरा उचलत होतो. कचरा निर्मूलनासाठी जनजागृती आवश्यक आहे. शहरातील उचलण्यासाठी आता १०४ घंटागाड्या आवश्यक आहेत. कचरा रोज निर्माण होणारा आहे, त्यामुळे हे काम दैनंदिन होणे आवश्यक आहे. त्यासाठी मनपा आणि मक्तेदारात समन्वय हवा.” आर.एम. तलवार, माजीसफाई अधीक्षक

नाशिक
नाशिकशहराची लोकसंख्या १४ लाख, तेथे रोज ४०० टन कचरा निर्मिती होते. तर रोज सुमारे ३६३ टन कचरा उचलला जातो. १५० गाड्या आहेत. सुमारे दीड हजार कर्मचारी काम करतात. कचरा उचलण्यासाठी दरवर्षी १२ कोटी रुपये खर्च केला जातो.

औरंगाबाद
लोकसंख्या१५ लाख, तेथे रोज ३५० टन कचरा उचलतात. त्यासाठी १७५ कर्मचारी, ८० घंटागाड्या आहेत. शिवाय ट्रक, जेसीबी आदी गाड्याही आहेत. सन २००८ मध्ये तेथे हैदराबादमधील कंपनीने मक्ता घेतला होता. पण तक्रारी वाढल्याने मनपाने तो रद्द केला.

१२० घंटागाड्यांची आवश्यकता
एकाप्रभागात दोन याप्रमाणे ५२ प्रभागांसाठी १०४ घंटागाड्या आवश्यक असून, १६ गाड्या राखीव असणे आवश्यक आहे. त्यामुळे डोअर-टू-डोअर कचरा उचलणे शक्य होईल; पण आता केवळ ५१ घंटागाड्या आहेत. त्यामुळे नागरिक कोंडाळ्याजवळ कचरा आणून टाकतात आणि तो मक्तेदारांकडून वेळेवर उचलला जात नाही.

सोलापूर शहराची लोकसंख्या १० लाख आणि दररोज साधारण ३२७ टन कचरा उचलला जातो. नाशिक शहरात १४ लाख लोकसंख्येमागे ४०० टन तर औरंगाबादमध्ये १५ लाख लोकसंख्येमागे ३६३ टन कचरा संकलन होतो. नाशिक आणि औरंगाबादशी तुलना करता सोलापूर आकाराने लहान असूनही रोज ३२७ टन कचरा तयार होतो. ३२७ टन कचरा उपलब्धतेचा आकडाही संशय निर्माण करणारा आहे.