आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वठारेंमुळे सोलापूरची रंगमंच चळवळ समृद्ध, ‘एका नामदेवाची नाट्यदिंडी’चे प्रकाशन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापूरला स्वत:चा एक चेहरा आहे. कवी, साहित्यिक, हुतात्म्यांची नगरी अशी लौकिक परंपरा सोलापूरला लाभली आहे. अर्थातच नाट्यप्रेमी नामेदव वठारे यांच्यासारख्या कलावंतांनी सोलापूरची रंगमंच चळवळ समृद्ध केली. इथल्या कलाकारांना महाराष्ट्राभर पोहोचवण्यासाठी नामदेव वठारे यांची कायम धडपड असायची. त्यांचा मुलगा गुरू यांच्या मदतीने नवी पिढी वाटचाल करतेय, असे गौरवोद््गार, अभिनेत्री अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष फय्याज यांनी काढले.
हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अॅम्फी थिएटर येथे रविवारी शोभा बोल्ली संपादित ‘एका नामदेवाची नाट्यदिंडी’ या पुस्तकाचे प्रकाशन फय्याज यांच्या हस्ते झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. मंचावर शोभा बोल्ली, प्रा. डॉ. सुहास पुजारी विराजमान होते.
त्या म्हणाल्या, ‘नामदेववठारे माणूस म्हणून खूप मोठे होते. त्यांच्या अंगी असलेले झपाटलेपण त्यांनी कधीच सोडले नाही. तोच वसा गुरू वठारे यांनी घेतला आहे. सोलापूरकरांनी आतापर्यंत मला खूप भरभरून प्रेम दिलं आहे. त्याचं प्रेम कधीच विसरू शकणार नाही.’
प्रा. डॉ. सुहास पुजारी म्हणाले, ‘सोलापूरही कलावंतांची भूमी. नामदेव वठारे हे श्रेष्ठ कलावंतांपैकी एक होते. सोलापूरची नाट्य अभिरुची घडविण्यात त्यांची भूमिका मोलाची होती. नेपथ्यामुळे नाटकांना जिवंतपणा येतो, मात्र नामदेव वठारे यांच्यामुळे त्या नाटकांना देखणेपणं प्राप्त व्हायचे.’
शोभा बोल्ली म्हणाल्या, ‘वठारेकाकांचाआणि माझा फार जवळचा परिचय नव्हता. ते लेखातून उलगडत गेले. नामदेव वठारे हे नाट्य उपासक होते. हाडाचे रंगकर्मी होते. माणसातील कलावंत कलावंतातील माणूसपण जपणारे नेपथ्यकार होते. गुरू वठारे यांनी प्रास्ताविक केले. ममता बोल्ली यांनी सूत्रसंचालन केले.
बातम्या आणखी आहेत...