आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्यातून चोरली कार, नगरपासून कांदा ट्रक पळवण्याचा केला होता प्लॅन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - तुळजापूर तालुक्यातील पाच मित्र. एकजण भाजीपाला व्यापारी होता. त्यात पन्नास हजार रुपयांचा तोटा आला. हे पैसे आता कोठून द्यायचे, अशा विचारात ते होते. 3 ऑगस्ट रोजी पुण्यात चोरलेल्या कारमधून नगरला गेले. तिथे ट्रक लुटायचा प्लॅन केला. तेवढय़ात त्यांना कांदा घेऊन जाणारा ट्रक दिसला आणि सुरू झाला नगर-सोलापूरपर्यंत पाठलाग. माढा शिवारातील भोईंजेजवळ आल्यानंतर पाच जणांनी आपले काम फत्ते केले. पण ते चारच दिवसांत पोलिसांच्या जाळ्यात पडले. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत ही माहिती मिळाली असून त्याची खातरजमा सुरू आहे.

संदीप उर्फ खंडू बसवराज होनमाने (वय 23, रा. हंगरगा, तुळजापूर), कासीम महमद बागवान (वय 30, रा. हंगरगा), संजय बाबूराव दुधभाते (वय 22, रा. येणेगूर, उमरगा), लक्ष्मण दशरथ क्षीरसागर (वय 20, हंगरगा), रवी बसवराज होनमाने (वय 21, रा. हंगरगा) यांना अटक झाली. शनिवारी दुपारी दोनच्या सुमाराला सोलापूर-हैदराबाद मार्गावरील मुळेगावजवळील अंबिका हॉटेलजवळ सापळा रचून ही कारवाई झाली. आमजाद सय्यद (रा. आंध्र प्रदेश) यांनी टेंभुर्णी पोलिसात फिर्याद दिली होती. ही घटना 21 ऑगस्ट रोजी रात्री साडेदहाच्या सुमाराला घडली होती. संदीप या घटनेचा मुख्य सूत्रधार आहे. कासीमला पैशाची गरज होती.