आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे पॅसेंजर रेल्वेने तोडले होते सिग्नल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - रेड सिग्नल असताना पुणे पॅसेंजर रेल्वेच्या चालकाने सुमारे 100 ते 200 मीटर गाडी पुढे दामटल्याची घटना मागील आठवड्यात मलिकपेठ रेल्वे स्थानकाजवळ घडल्याचे वृत्त आहे. मलिकपेठपासून काही अंतरावर एक गाडी उभारली होती. या प्रकरणाच्या चौकशीचे सूतोवाच रेल्वे व्यवस्थापक जॉन थॉमस यांनी केले आहे. सिग्नल ओलांडला तरी अपघात झाला नसता, अशी पुस्ती मात्र त्यांनी जोडली.

सोलापूरहून रात्री साडेअकराच्या सुमाराला पुणे पॅसेंजर निघते. साधारणत: मध्यरात्री दोनच्या सुमाराला मलिकपेठ स्थानकाजवळ गाडी आली असताना रेड सिग्नल दिला गेला. तरीही सिग्नल ओलांडून गाडी सुमारे 100 ते 200 मीटर धावली. दरम्यान, चालकाने गाडी पुन्हा मागे घेतली. रेड (डेंजर) सिग्नल दिलेला असताना गाडी पुढे धावणे म्हणजे गंभीर स्वरूपाचा प्रकार समजला जातो. रेल्वेची समोरासमोर धडक होणे अथवा तशी परिस्थिती निर्माण करणे हा गंभीर स्वरूपाचा अपघात मानला जातो. नुकतेच दिल्ली ते उधमपूर येथे अशा स्वरूपाचा अपघात झाला होता.

अपघात झाला नसता
- पुणे पॅसेंजरला दुसरा ट्रॅक दिला होता. उपलब्ध दुस-या ट्रॅकवरून डाऊन गाडी येणार होती. त्यामुळे रेल्वेचा अपघात नसता. तरी या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. यावर आताच बोलणे योग्य नाही. जॉन थॉमस, विभागीय रेल्वे व्यवस्थापक.

घटना गंभीरच
- रेल्वे चालकाने कोणत्याही परिस्थितीत सिग्नलचे पालन करणे गरजेचे आहे. रेल्वे अपघात टळला तरीही घटनेचे गांभीर्य ओळखून दोष कोणाचा हे तपासणे गरजेचे आहे. घटनेची नोंद स्टेशनला होणे क्रमप्राप्त असते. दोषीवर रेल्वे प्रशासनाने कारवाई करणे अपेक्षित आहे.
संजय पाटील, उपाध्यक्ष, जिल्हा प्रवासी संघ
फोटो - डमी पिक