आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 हजार आरसी स्मार्टकार्डचे वितरण प्रलंबित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- येथील उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयातील(आरटीओ) ऑप्टिकल मशीनमध्ये बिघाड झाल्याने गेल्या दोन महिन्यांपासून 12 हजारांहून अधिक आरसी स्मार्ट कार्डचे वाटप रखडले आहे. आरसी कार्ड मिळत नसल्याने वाहनधारक वैतागले आहेत.

आरटीओ कार्यालयात आरसी कार्ड तयार करणार्‍या तीन मशीन आहेत. दिल्ली येथील रोज र्मटर या संस्थेच्या वतीने स्मार्ट कार्ड बनवून देण्याचे काम येथे चालते. स्मार्ट कार्डसाठी ग्राहकांकडून 350 रुपये शुल्क आकारले जाते. मात्र, आरटीओ कार्यालयातील तिन्ही मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आरसी कार्ड तयार करण्याची यंत्रणाच खोळंबली आहे.त्यामुळे मागील दोन महिन्यांची आरसी कार्ड प्रलंबित राहिलेली आहेत. ही बाब निदर्शनास आल्यानंतर आरटीओ प्रशासनाने दिल्लीतील संस्थेला याची कल्पना दिली आहे. त्यानंतर केवळ एकच मशीन बदलून देण्यात आले. परंतु काही दिवसांनंतर ही मशीन बंद पडली.

मशीन लवकरच सुरू होईल
आरसी स्मार्ट कार्ड तयार करण्याचे काम दिल्लीतील रोज र्मटर संस्था करते. त्यांनी दिलेल्या मशीन बंद आहेत. त्यामुळे कार्ड निर्मिती थांबली गेली आहे. मशीन बंद असल्याचे संस्थेला कळवले आहे. दोन दिवसांत नवीन मशीन कार्यालयात बसवण्यात येणार आहे. शिल्लक कामाचा निपटारा लवकरात लवकर करण्याचे आदेश दिले आहेत.’’ दीपक पाटील, उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी