आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • R.R.Patil Start Speaking About Ncp Propaganda, Divya Marathi

आजपासून आबांची धडाडणार तोफ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयसिंह मोहिते यांच्या प्रचाराचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री आर. आर. पाटील शनिवार आणि रविवारी मतदारसंघाच्या दौर्‍यावर येत आहेत. करमाळा, सांगोला, माळशिरस तालुक्यात त्यांच्या जाहीर सभाही होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने पाटील यांच्याकडे माढा मतदारंसंघाच्या निरीक्षकपदाची जबाबदारी सोपवली आहे. सांगली जिल्ह्याच्या राजकारणात पाटील विरुद्ध स्वाभिमानी संघटना असा सामना नेहमीच रंगतो. यापूर्वी सभांमध्येही पाटील यांनी खोत यांच्यावर थेट हल्ला चढवला होता. ‘वाळव्याचे पार्सल परत पाठवा, मी त्याचा बंदोबस्त करतो’ या टीकेवर बराच खल झाला होता. आता पुन्हा ते प्रचार सभा घेणार आहेत.

येथे होणार सभा
शनिवार : करमाळा, स. 11 वा., आवाटी - दु. 4.30 वा., कुडरुवाडी - सायंकाळी 7 वा.
रविवार : वेळापूर - सकाळी - 10 वा., पिलीव - दू. 4 वा., सोनंद - सायंकाळी 7.30 वा.