आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • R.R.Patil News In Marathi, Pratapsinh Mohite, Divya Marathi

प्रतापसिंहांची उमेदवारी हे मुंडेंचे कारस्थान , आर. आर. पाटील यांची टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकलूज - माढा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून दाखल झालेली प्रतापसिंह मोहिते यांची उमेदवारी हे गोपीनाथ मुंडे यांचेच कारस्थान आहे. केंद्रात ‘नमो’चा नारा देणारे मुंडे राज्यात मात्र स्वत:चा प्रभाव वाढवण्याचा प्रयत्नात महायुतीतील घटक पक्षांना गिळण्याचा डाव टाकत आहेत, अशी टीका गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी रविवारी दिली. वेळापूर (ता. माळशिरस) येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


गृहमंत्री म्हणाले, प्रतापसिंहांवर आमचा आक्षेप नाही, मात्र मुंडेना या प्रकरणात कायमचे लक्षात ठेवू. मुख्यमंत्रिपदाचे ध्येय ठेवून भाजप शिवसेनेला संपवण्याच्या प्रयत्नात आहे. महायुतीत पाच जण होते आता सहावा भिडू म्हणून आमदार विनायक मेटे यांची शिवसंग्राम संघटना आली आहे. या सहा जणांच्या आघाडीला काय म्हणायचे, हे आता जनतेनेच ठरवावे. ‘शेतकरी ऑक्टोबरमध्ये साखर कारखान्यांची धुराडी पेटवतात, मात्र हा बहाद्दर रस्त्यावर टायर पेटवतो. देवकीनंदनसारखी दूध संस्था चालवता येत नाही,’ अशी टीका त्यांनी सदा खोत यांच्यावर केली.