आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजलक्ष्मीच्या मृत्यूप्रकरणी बिल्डर, महापालिकेच्या अधिका-यावर गुन्हा दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- दत्तचौकातील शाश्वत मॅजिस्टिक संकुलात लिफ्टमधून जाताना शाळकरी मुलगी राजलक्ष्मी शिंदे हिचा मृत्यू झाला होता. दोन महिन्यांनंतर फौजदार चावडी पोलिसात संबंधित बांधकाम व्यावसायिक शहा, त्यांचे भागीदार महानगरपालिकेतील बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

संजय शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. २० जुलै २०१४ रोजी ही घटना घडली होती. राजलक्ष्मी ही लिफ्टमधून घरी जात होती. त्यावेळी लिफ्ट बंद पडल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत तिचा मृत्यू झाला. या घटनेला जबाबदार धरून बांधकाम व्यावसायिक, महापािलका अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिंदे यांनी पोलिसांकडे केली होती. मात्र, गुन्हा दाखल होण्यासाठी दोन महिने लागले.
राजलक्ष्मी ही माजी नगरसेविका जयश्री शिंदे यांची मुलगी आहे. मनपा बांधकाम विभाग, मुंबईचे लिफ्ट परवाना विभागा यांच्याकडे शिंदे यांनी पाठपुरावा केला. यानंतर पोलिसांत सोमवारी सायंकाळी साडेपाचला गुन्हा दाखल झाला. शाश्वत मॅजिस्टिकचे बिल्डर शहा, त्यांचे भागीदार सहकारी, मनपा बांधकाम विभाग अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. बिल्डर शहा यांचे भागीदार साथीदार, मनपा अधिकारी कोण याची चौकशी करून तपासात नावे निष्पन झाल्यानंतर संबंधितावर कारवाई होईल, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. फौजदार एस. के. खटाणे तपास करत आहेत.