आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषदेत निधीसाठी पदाधिका-यांमध्ये ‘रेस’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जिल्हा परिषद सेस फंडातील रक्कम सप्टेंबरपर्यंत खर्च करणा-या विभागास पुन्हा निधी देण्याचे अध्यक्षा जयमाला गायकवाड यांनी जाहीर केल्यामुळे इतर पदाधिका-यांमध्ये निधी मिळवण्यासाठी रेस लागली आहे. सप्टेंबरअखेर पर्यंत मिळालेला निधी खर्चाची तयारी केली असून कृषी समितीने त्यामध्ये आघाडी घेतली. नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी खरेदीच्या प्रक्रियेला मंजुरीही दिली.

जिल्हा परिषद सेस फंडाचा सुमारे ४१ कोटी रुपयांचा निधी सर्व विभागांना वाटून देण्यात आला. समाजकल्याण विभागाने गेल्यावर्षी मिळालेला २० टक्केपेक्षा जास्त निधी अखर्चित ठेवला. त्यामुळे एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान मंजूर असलेला निधी खर्च करून अखर्चित निधी आपल्याच विभागाकडे वळवण्यासाठी पदाधिका-यांची लगबग सुरू आहे. यंदाच्या वर्षी अर्थसंकल्पामध्ये कृषी पशुसंवर्धन समितीचे सभापती पंडित वाघ यांनी भरपूर निधी मिळवला आहे. मिळालेला निधी सप्टेंबरपूर्वी खर्चाचे त्यांचे नियोजनही तयार आहे. बुधवारी (दि.१) कृषी पशुसंवर्धन समितीच्या बैठकीत त्यांनी वैयक्तिक लाभ योजनेच्या ३० लाख रुपयांंपर्यंतच्या खरेदीला मंजुरी दिली, हे विशेष. त्याचबरोबरीने शिक्षण सभापती मकरंद निंबाळकर यांचेही प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी ई-लर्निंग, बेंच खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्या दोन विभागांच्या तुलनेत महिला बालकल्याण, समाजकल्याण विभागाने हालचाली संथ आहेत. दरम्यान, सुरुवातीला निधी मिळवण्यासाठी नियोजन करून आघाडीवर असलेल्या पदाधिका-यांची तीच भूमिका कायम राहणार की फारसे सक्रिय नसलेल्या विभागांकडून ठोस कृती धोरण राबवून त्यांना आव्हान देत त्यांचे निधी मिळवण्याचे मनसुबे उधळणार, हे लवकरच स्पष्ट होईल.