आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर विमानतळावर रडार बसवले!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - होटगी रोडवरील विमानतळावर "नॉन डायरेक्शन बीकम'चे रडार बसवण्यात आले आहे. त्यामुळे विमानसेवा सुरू होण्याबाबत सकारात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत. कोणत्याही विमानाच्या अथवा हेलिकॉप्टरच्या पायलट यांना सोलापूर विमानतळ नेमक्या कोणत्या दिशेला आहे, कुठे आहे, याची निश्चित माहिती मिळण्यासाठी हे रडार महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

रडारमधून बाहेर पडणा-या संदेशामुळे लहरीच्या माध्यमातून वैमानिकाशी संपर्क होणार आहे. व्यापारी एअर इंडिया यांच्यातील समन्वयासाठी सोशल फोरमने प्रयत्न सुरू केले आहेत. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यामुळे एअर इंडियाचे वाणिज्य विभागाचे विक्री अधिकारी अजित सलगरे आणि वाणिज्यअधिकारी पल्लव परारकर हे सोलापुरात येऊन गेले होते. या बैठकीत व्यापा-यांकडून हवाई सेवेची गरज जाणून घेतली. यापूर्वीच्या विमानसेवेतील अडथळ्यांची माहितीही त्यांनी घेतली. त्यानंतर आठच दिवसांत सोलापूर विमानतळावर रडार बसवण्यात आले. या रडारचे प्रभाव क्षेत्र ६० नॉटिकल माइल्स इतके आहे. या क्षेत्रात उडणा-या प्रत्येक विमानाच्या अथवा हेलिकाप्टरच्या वैमानिकांना सोलापूर विमानतळाची माहिती मिळणार आहे. हे रडार दिल्लीहून आणलेले असून याची किंमत २० लाख रुपये आहे. पूर्वी सोलापूर विमानतळावर जर एखादे विमान अथवा हेलिकॉप्टर येणार असेल तर त्या विमानाच्या पायलट यांना सोलापूर विमानतळाविषयीची माहिती फोनद्वारे देण्यात यायची. तसेच विमानतळाचे ठिकाण कळण्यासाठी ते अक्षांश रेखांशचा वापर करित होते. आता मात्र रडारमुळे विमानतळाचे निश्चित ठिकाण कळणार आहे.

नाइट लँडिगसाठी महत्त्वाचे : सोलापूरविमानतळावरून रात्री विमानसेवा मिळावी म्हणून धावपट्टीच्या दोन्ही बाजूने पापी लाइट्स बसवण्यात आले आहे. नव्या रडारमुळे रात्रीच्या वेळी वैमानिकांना सोलापूर विमानतळाचे अचूक ठिकाण कळणार आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे
भारतीयिवमानतळ प्राधिकरणाने सोलापूर विमानतळावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव प्राधिकरणाच्या मुख्यालयाकडे सादर केला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर लागलीच विमानतळावर कॅमेरे बसवण्यात येतील.

विमानसेवा सुरूव्हावी यासाठी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याबरोबर गुरुवारी सकाळी पुन्हा बैठक होईल. एअर इंडियाच्या अधिका-यांना सांगून ही सेवा लवकरात लवकर सुरू करावी. येथील व्यापारी विमानसेवेसाठी सकारात्मक प्रतिसाद देत असल्याचा विश्वास आम्ही देणार आहोत. -परागशहा (सहसचिव, सोलापूर सोशल फोरम)

सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू होण्यासाठी ज्या काही आवश्यक बाबी आहेत, त्यांची तत्काळ पूर्तता करण्यात येईल. वैमानिकांना सोलापूर विमानतळ नेमके कोठे आहे, हे कळण्यासाठी रडार बसवले आहे. उर्वरित सुविधांसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण करून लवकरच पुरवल्या जातील. - प्रदीप गायकवाड, सोलापूर विमानतळ प्रमुख