आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhi News In Marathi, Congress Committee, Video Conference, Divya Marathi

राहुलच्या ‘व्हीसी’मध्ये महाराष्ट्र ठरला अनलकी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - अखिल भारतीय कॉँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देशभरातील कॉँग्रेस कायकर्ते आणि सवर्सामान्य नागरिकांशी संवाद साधला. इतर राज्यांतील संवाद होईपर्यंत वेळ संपला आणि महाराष्ट्राचा नंबर लागलाच नाही. यामुळे प्रतीक्षेत बसलेल्या सोलापूरच्या कार्यकर्त्यांची निराशा झाली.
सकाळपासूनच कॉन्फरन्स सुरू झाली होती. सर्व राज्यांतील कॉँग्रेस कार्यकर्ते आणि सवर्सामान्य नागरिक व्हिडिओ स्क्रिनसमोर ठिय्या मांडून होते. महाराष्ट्राकरता दुपारी 11 ते 12 हा एक तास देण्यात आला होता. त्यामुळे सोलापुरातही सकाळी नऊ वाजता कॉँग्रेस भवन येथे व्हिडिओ यंत्नणा तयार करून तपासण्यात आली. आसन व्यवस्थाही करण्यात आली. साडेदहा वाजता कॉन्फरन्स हॉलमध्ये सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमले. त्यावेळी स्क्रिनवर तामिळनाडू, आसाम, ओडिसा येथील कार्यकर्त्यांशी संवाद सुरू होता.
तामिळनाडू आणि ओडिसा येथील कार्यकर्त्यांशी इंग्रजीत संवाद झाला. आसाम, उत्तर प्रदेश, पंजाब आणि बंगाल येथील कार्यकर्त्यांशी हिंदीमध्ये संवाद झाला. हा संवाद होईपर्यंत दुपारचे बारा वाजले आणि संवादाची वेळ संपली. राहुल गांधी यांच्याशी एक शब्द तरी बोलता येईल, या आशेने बसलेल्या सोलापूरकरांची मात्न निराशा झाली.
या वेळी आमदार दिलीप माने, कॉँग्रेस शहराध्यक्ष धर्मा भोसले, माजी मंत्नी आनंदराव देवकते, माजी मंत्नी सिद्धाराम म्हेत्ने, माजी आमदार निर्मलाताई ठोकळ, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी महापौर नलिनी चंदेले, मध्य विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक हाजीमलंग नदाफ, उत्तरचे सुनील रसाळे, अमोल शिंदे, इंदुमती अलगोंडा पाटील आदींसह कायकर्ते उपस्थित होते.
व्हिडिओ कॉन्फरन्समधील गमती-जमती
व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सूत्रसंचालनाची जबाबदारी प्रियंका चतुर्वेदी यांच्याकडे होती. त्यांचा चेहरा पाहून काही जण प्रियंका चोप्रा म्हणत होते. काही माजी मंत्री फोटोग्राफरला स्वत:चा फोटो कट करू नकोस, असे म्हणत होते. परंतु एका माजी मंत्र्याचा फोटो कव्हर केला की, दुसर्‍या माजी मंत्र्यांचा फोटो कट होत होता. ऑपरेटरने स्क्रिनवर सोलापूरचा सीन आणून ठेवला अन् सोलापूरकरांची गफलत झाली. ते पाहून ‘आला आला आपला नंबर आला’ अशा शब्दांत सोलापूरकरांनी आनंद व्यक्त केला.
राहुल गांधी यांचे विचार
पक्षातील सवर्सामान्य कार्यकर्ता हाच कॉँग्रेसचा ‘कणा’
15 कोटी नागरिकांना गरिबीतून काढण्यात आले
गुजरातमध्ये शीख बांधवांना त्नास