आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डान्सबारचा संशय, ऑर्केस्ट्रा बारवर छापे, पोलिसांविना महसूलची कार्यवाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या आदेशाने शुक्रवारी मध्यरात्री शहर परिसर दुधनी येथील ऑर्केस्ट्रा बारवर महसूल पथकाकडून अचानक छापे टाकण्यात आले. पोलिस विभागाची कोणतीही मदत घेता महसूल प्रशासनातील अधिकऱ्यांकडून ही तपासणी मोहीम राबवली.
यामध्ये आर्केस्ट्रा बारला परवानगी आहे का? दिलेल्या नियमानुसार बार चालवले जाते का? ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली डान्सबार चालतो का? अशा सर्व गोष्टींची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येणार आहे. मोहिमेत १५ अधिकाऱ्यांनी छापा टाकला. पहाटेपर्यंत बारची तपासणी करण्यात आली. तपासणीचा अहवाल येत्या दिवसांमध्ये जिल्हाधिकारी यांना सादर केला जाणार आहे.
टँकरमुक्तीनंतर अवैध आर्केस्ट्रा बारकडे मोर्चा
जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे जिल्ह्यातील अनधिकृत चुकीचे व्यवसाय बंद करण्यासाठी विशेष मोहीम राबवत आहेत. टँकरमुक्तीनंतर जिल्हाधिकारी मुंढे यांनी अनधिकृत विनापरवाना ऑर्केस्ट्रा बारकडे मोर्चा वळवला आहे. असे व्यवसाय बंद करण्यासाठी जिल्हाधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी यांनी गोपनीय मोहीम तयार करून शुक्रवारी मध्यरात्रीनंतर छापा टाकला. यामध्ये अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत.

तर परवाना करणार रद्द
शुक्रवारी रात्री महसूलच्या पथकांकडून आर्केस्ट्रा बारवर छापा टाकून तपासणी करण्यात आली आहे. चौकशी अहवालात जे बारचालक दोषी आढळतील, त्यांचा परवाना रद्द करण्यात येतील. परवानाच नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील.”
तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी
यापूर्वी मुंढे यांनी स्वत: केली होती कारवाई
यापूर्वीजिल्हाधिकारी मुंढे प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी असताना दुधनी येथील ऑर्केस्ट्रा बारवर कारवाई केली होती. आता पुन्हा जिल्हाधिकारी म्हणून आल्यानंतर दुधनीसह इतर ऑर्केस्ट्रा बारवर छापा टाकण्यात आला आहे. चौकशी अहवालात काय असणार? विनापरवाना ऑर्केस्ट्रा बारवर कोणती कारवाई होणार? याची उत्सुकता लागली आहे.
या ऑर्केस्ट्रावर छापा
शिवाजीनगर: पॅराडाइज न्यू विजय
सोरेगाव : नागेश
भोगाव : सुखसागर
रेल्वे स्टेशन : सागर
मुळेगाव : येथील राजश्री
वडकबाळ : आम्रपाली
दुधनी : फ्रुटी (शांभवी)
बातम्या आणखी आहेत...