आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘रेल्वेवारी’ घटली गाड्या अधिक, उत्पन्न कमी

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर: आषाढी वारीसाठी पंढरपूरला येणार्‍या वारकर्‍यांनी परतीच्या प्रवासासाठी यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत रेल्वेचा कमी वापर केल्याने रेल्वेच्या उत्पन्नात मोठय़ा प्रमाणात घट झाली. ही माहिती रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुशील गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मागील वर्षी रेल्वेने प्रवास करणार्‍यांची संख्या एक लाख 16 हजार नऊशे पंधरा होती. ती यंदा एक लाख पाच हजार नऊशे एकोणऐशीवर पोहचली आहे. 11 हजाराने प्रवाशी संख्या घटली आणि उत्पन्नांत चार लाखाची घट झाली. यंदाच्या वर्षी रेल्वे गाड्यांची संख्या अधिक होती. तरीही उत्पन्नात घट झाली.
दरम्यान, दिल्ली येथील संसदीय समितीकडून शिर्डी स्थानकाची पाहणी केली. 12 लोकसभा सदस्य असलेल्या समितीने 22 व 23 जून रोजी ही पाहणी केली. सोलापूर विभागात अशी पाहणी करण्याची ही पहिलीच घटना आहे.