आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोहमार्ग पोलिस पळाले, अन् चोर डब्यात चढले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - पुण्याहून सोलापूरला येणारी पॅसेंजर गाडी बुधवारी पहाटे भाळवणी रेल्वे स्थानकावर थांबली असताना सर्वसाधारण डब्यावर दरोडा पडला. यात 54 हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला. घटनेआधीच कामावर असलेल्या लोहमार्ग पोलिसांनी तेथून पोबारा केला असल्याची चर्चा आहे. पोलिस जर स्थानकावर उपस्थित असते तर कदाचित रेल्वेवर दरोडा पडलाच नसता.

स्थानकावर तीन पोलिसांची रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत नेमणूक होती. मात्र, ड्युटी पूर्ण न करताच पुण्याला निघून गेले. हेड कॉन्स्टेबल एच. सी. गायकवाड, बक्कल क्रमांक 512 शितोळे, व बक्कल क्रमांक 24 पुगले यांची नेमणूक होती.

नेमणुकीसाठी असलेले पोलिस घटनेच्या वेळी गैरहजर असल्याची माहिती आली आहे. घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीत ते जर अनुपस्थित असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.’’ एस. जी. सोनवणे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक, पुणे लोहमार्ग पोलिस