आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेल्वे भाडेवाढ मागे घ्या! डीआरएम कार्यालयावर माकपचा हल्लाबोल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - भाजपप्रणीत केंद्र सरकारने महागाई नियंत्रणापेक्षा जनविरोधी धोरण लादणे सुरू केले आहे. रेल्वे दरवाढीने सामान्यांना फटका बसला आहे. रेल्वे मालवाहतूक भाडे दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढतील, तरी तातडीने दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे. दरवाढ मागे घेण्यासाठी पक्षाच्या वतीने विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

पक्षाच्या केंद्रीय समितीचे सदस्य नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. या वेळी बोलताना त्यांनी, भाजप आणि काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला. महागाई व भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून जनतेने काँग्रेसला सत्तेवरून खेचले. याच मुद्द्यांचा अजेंडा घेऊन भाजपने सत्ता मिळवली. ‘अच्छे दिन आनेवाले है...’ म्हटले. परंतु एकंदर धोरणे पाहिली तर ‘बुरे दिन आनेवाले है’ असेच वाटते, असा टोला श्री. आडम यांनी लगावला.

या आंदोलनात महिबूब हिरापुरे, फातिमा बेग, लिंगव्वा सोलापुरे, शकुंतला पाणिभाते, प्रभाकर तेलंग, सलीम मुल्ला, बाबू कोकणे, अजीज पटेल, दत्ता चव्हाण, सिद्धाराम उमराणी, इलियास सिद्दिकी, अशोक बल्ला, दीपक निकंबे, अनिल वासम, प्रशांत म्याकल, सनी शेट्टी, बाळकृष्ण मल्याळ, नरसिंग म्हेत्रे, रवी म्हेत्रे, दाविद कुमार आदी सहभागी होते.
...अन् डीआरएमशी चर्चा
निवेदन देणार्‍या शिष्टमंडळाशी चर्चा करण्यास विभागीय रेल्वे व्यवस्थापक जॉन थॉमस यांनी नकार दिला होता. त्या वेळी शिष्टमंडळाने पुन्हा हल्लाबोल केला. सामान्य जनतेचे प्रश्न घेऊन आलो आहोत. ते रेल्वेमंत्र्यांपर्यंत पोचवा, असा पुकार सुरू झाला. त्यामुळे थॉमस यांनी चर्चेची तयारी दर्शवली. दहा-पंधरा मिनिटे चर्चा केल्यानंतर थॉमस यांनी लोकांच्या भावना रेल्वे मंत्रालयापर्यंत पोचवण्याचे आश्वासन दिले. या शिष्टमंडळात अ‍ॅड. एम. एच. शेख, नसीमा शेख, माशप्पा विटे, व्यंकटेश कोंगारी, शेवंता देशमुख, युसूफ मेजर, रंगप्पा मरेड्डी, शंकर म्हेत्रे आदींचा समावेश होता.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक जॉन थॉमस यांना निवेदन देताना माकपचे नेते नरसय्या आडम. शेजारी एम. एच. शेख, युसूफ मेजर, व्यंकटेश कोंगारी आदी.