आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाताळाच्या सुटीनिमित्त रेल्वेगाड्या झाल्या फुल्ल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूरहून जाणार्‍या व येणार्‍या रेल्वेगाड्या नाताळच्या सुटीनिमित्त फुल्ल झाल्या आहेत. शाळांना व कार्यालयांना सुटी असल्याने अनेक जण रेल्वेने प्रवासाचे बेत आखत आहेत. त्यामुळे 20 डिसेंबर ते पूर्ण जानेवारीपर्यंत सिद्धेश्वर, सोलापूर-मुंबई एक्स्प्रेससह अन्य महत्त्वाच्या गाड्यांना वेटिंग सुरू आहे. तर कर्नाटक एक्स्प्रेसला रिगेट्र आहे. त्याचे आता तिकीट सुद्धा मिळणार नाही.

ख्रिश्चन बांधवांचा 25 डिसेंबर रोजी नाताळचा सण असतो. त्यानिमित्त अनेक जण या निमित्ताने मिळणार्‍या सुटीचे नियोजन करून प्रवासाला निघतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या दृष्टीने हा सुटीचा हंगाम आहे. यात प्रामुख्याने लांबपल्ल्यांच्या गाड्यांना अधिक मागणी आहे. सोलापूर ते पुणे धावणार्‍या हुतात्मा एक्स्प्रेसला केवळ 24 डिसेंबरपर्यंत वेटिंग आहे. त्यानंतर तिकीट उपलब्ध आहे.