आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Railway Line Area Flat Rate Increases In Solapur

रेल्वे लाइन्स भागात शहरातील सर्वाधिक महाग दराने फ्लॅट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - मागील दोन वर्षांत शहरातील फ्लॅटचे भाव गगनाला भिडल्याची प्रचिती घरांचे स्वप्न पाहणार्‍यांना येत आहे. रेडिरेकनरनुसार (शासकीय मूल्यांकन) रेल्वे लाइन्स भागातील फ्लॅटचे दर प्रति चौरस फूट 1965 ते 3200 रुपये तर नवी पेठेत 660 ते 1540 रुपये प्रति चौरस फुटाला मोकळ्या जागेचा दर प्रस्तावित केला आहे. यामध्ये 2014 साठी 19 टक्के वाढ सूचवण्यात आली.

गेल्या 5 वर्षांत जागेच्या किमतीत वाढ झाली. काही नवीन प्रकल्पांमुळे जागांच्या किमती वाढल्याचे अधिकार्‍यांचे मत आहे. मात्र शहर, शहराच्या हद्दीत जागा वा फ्लॅट खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना शासकीय मूल्यांकनामध्ये फारशी वाढ झाली नसल्याचे दिसून येते. शासकीय मूल्यांकनानुसार सर्वाधिक मूल्य असलेल्या रेल्वे लाइन्स भागात आज 1 हजार चौरस फूट फ्लॅटची किंमत 20 ते 32 लाख रुपयांपर्यंत आहे, तर बाजारातील किंमत 50 लाखांपेक्षा अधिक आहे. तशीच स्थिती शहरातील इतर भागातील फ्लॅटची आहे.