आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Railway Minister Trying To Start 2 New Trains Via Solapur

लवकरच सोलापूरवरून धावणार दोन नव्या रेल्वेगाड्या, रेल्वेमंत्री प्रयत्नशील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- यशवंतपूर ही गाडी आता दररोज केल्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुलबर्गा रेल्वे स्थानकावरून आणखी दोन नव्या गाड्या सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यात बंगळुरू ते अजमेर आणि बंगळुरू ते जम्मू या नव्या गाड्यांचा समावेश आहे. गुलबग्र्याचे प्रवाशी नजरेसमोर ठेवून प्रयत्न सुरू असले तरी या गाड्या सुरू झाल्यास सोलापूरकरांचीही त्यामुळे सोय होणार आहे.

गुलबर्गा रेल्वे स्थानकावर मंगळवारी खर्गे यांच्या हस्ते सोलापूर-यशवंतपूर एक्स्प्रेसचे उद्घाटन झाले. वरील दोन्ही गाड्या सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले. दोन्ही गाड्यांच्या मार्गासंबंधी चाचपणी सुरू असून त्या कल्याण, पनवेल मार्गे काढायच्या की मनमाड मार्गे, याबद्दल वरिष्ठ पातळीवरून विचारविनिमय सुरू असल्याचे ते म्हणाले. यापैकी दोन्ही मार्ग सोलापूरवरूनच जातात.