आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे अधिकारी आले कारखान्यांच्या दारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - काही दिवसात साखरेचा गळीत हंगाम सुरू होत आहे. तयार होणारी साखरेची वाहतूक रेल्वेच्या माध्यमातूनच व्हावी, यासाठी रेल्वेची मालवाहतूक वाढविण्यासाठी सोलापूर रेल्वे विभागाचे अधिकारी प्रयत्नशील आहेत.

गेल्या काही दिवसांपासून विभागीय रेल्वे व्यवस्थापक जॉन थॉमस यांच्यासह अतिरिक्त रेल्वे व्यवस्थापक के. मधुसूदन, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक नरपत सिंह, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक नर्मदेश्वर झा आदी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी साखर कारखान्यांच्या भेटीवर आहेत. यामुळे रेल्वेद्वारे होणारी मालवाहतूक वाढण्यास मदत होणार आहे.

रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच विठ्ठल शुगर्स विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याला भेट दिली. यात त्यांनी कारखान्याच्या चेअरमन यांच्यासोबत चर्चा करून भविष्यात केली जाणारी साखरेची वाहतूक ही रेल्वेद्वारे करण्यात यावी अशी मागणी केली. ज्या प्रमाणात मालवाहतूक वाढेल त्या प्रमाणात रेल्वेला िमळणाऱ्या उत्पन्नातही चांगलीच वाढ होणार आहे.

एिप्रल ते ऑक्टोबर २०१३ दरम्यान सोलापूर विभागातून २७ गाड्यांतून ७१ हजार टन साखरेची वाहतूक झाली आहे. यातून रेल्वेला १४ कोटी ५० लाख रुपयांचे उत्पन्न िमळाले आहे. तर यंदाच्या वाहतुकीचा आकडा याहून चांगला आहे. एप्रिल ते ऑक्टोबर २०१४ दरम्यान साखरेचे ८१ गाड्या लोड करण्यात आल्या. म्हणजेच जवळपास कोटी १० लाख टन साखरेची वाहतूक झाली आहे. यातून सोलापूर विभागाला ३९ कोटी रुपयांचे उत्पन्न िमळाले आहे. असे असले तरी सोलापूर विभागाने २०० गाड्या साखरेची मालवाहतूक करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी सर्व अधिकारी मालवाहतूक वाढविण्यासाठी साखर कारखान्यांच्या भेटीला जात आहेत. भेटीवेळेस मुख्य विपणन निरीक्षक महेशचंद्र ओमहरी यांचा उपस्थिती होती.

सर्व कारखान्यांना भेटी
सोलापूर परिसरातील मालवाहतूक वाढविण्यासाठी सर्वच अधिकारी कारखान्यांना भेटी देत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील अन्य जिल्ह्यातील कारखान्याना भेट देऊन त्यांना रेल्वेद्वारे मालवाहतूक करण्यासाठी विनंती केली जाणार आहे.” नर्मदेश्वरझा, वरिष्ठविभागीय वाणिज्य व्यवस्थापक
साखर जाते बंगालला
सोलापुरातूनफार मोठ्या प्रमाणात साखर आसाम पश्चिम बंगालमध्ये पाठविण्यात येते. यात न्यू गुवाहटी, डाकुनी, कोलकाता, दिल्ली आदी शहरांचा समावेश आहे.
सोलापूर रेल्वे विभागाचा साखर वाहतुकीतून उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न