आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे प्रवाशांची ‘अडचण’ सुटणार लवकरच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - अनेक प्रवासी रेल्वेचे आरक्षित तिकीट काढण्यासाठी स्थानकावरील आरक्षण केंद्रात जातात. त्यासाठी ते आपला वेळ व पैसा दोन्ही खर्ची घालतात. प्रवाशांना आपल्या घराच्या परिसरातच रेल्वेचे आरक्षित तिकीट काढता यावे, म्हणून सोलापूर रेल्वे प्रशासनाने फिरते आरक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे बुधवारी ती मोबाइल व्हॅन सोलापूर रेल्वे विभागात दाखल झाली. ही योजना येत्या काही दिवसांत प्रत्यक्ष सुरू होणार आहे.

रेल्वेच्या अधिकृत फिरते आरक्षण केंद्रामुळे सोलापूरकरांची सोय होणार आहे. सोलापूर विभागाने त्याचे नियोजन केले असून काही तांत्रिक कारणांमुळे ही योजना सुरू झाली नव्हती. आता लवकरच ती सुरू होईल. हे फिरते आरक्षण केंद्र शहरासह तुळजापूर व अक्कलकोट येथेही ठरलेल्या दिवशी जाईल.


असे आहे वेळापत्रक
सोमवारी - सकाळी 8 ते 11 विजापूर रोडलगच्या भारती विद्यापीठसमोर. 11.30 ते दुपारी 3, नवीन आरटीओ कार्यालय
मंगळवार - तुळजापूर येथील भवानी मंदिर परिसरात सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत.
बुधवार - तुळजापूर येथील शिवाजी चौक परिसरात सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत.
गुरुवार - अक्कलकोट येथील स्वामी सर्मथ मंदिर परिसरात सकाळी 8 ते दुपारी 3 .
शुक्रवार - अक्कलकोट येथील एसटी स्टॅन्डचा परिसर.
शनिवार - सोलापुरातील होटगी नाका येथे सकाळी 8 ते 11, आसरा चौक परिसरात 11.30 ते दुपारी 3.
रविवारी - सोलापुरातील अशोक चौकात सकाळी 8 ते 11, वालचंद कॉलेज, सकाळी 11.30 ते दुपारी 3.