आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात रेल्वे आरक्षण बंदमुळे झाली प्रवाशांची गैरसोय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- रेल्वे आरक्षण केंद्र रविवारी तासभर आधी बंद झाले. त्यामुळे प्रवाशांची काहीशी गैरसोय झाली. संगणक प्रणालीच्या उन्नतीकरणासाठी सोलापूरसह चार विभागांत संगणकप्रणाली बंद ठेवण्यात आली. रात्रभर काम चालणार असून सोमवारी ते सुरळीत होणार आहे.
मध्य रेल्वेतील सोलापूर, मुंबई, पुणे, नागपूर, भुसावळ विभागात आरक्षण केंद्र रविवारी सायंकाळी सात ते सोमवारी पहाटे 3 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. रविवारी एरवी सायंकाळी आठला केंद्र बंद होते. त्यामुळे सोलापूरला याचा फारसा फटका बसला नाही. तिकीट रद्द करू इच्छिणार्‍यांसाठी चालू तिकीट खिडकीवर सोय करण्यात आली.

ई-तिकीट सुरूच
सिस्टीम अपग्रेडसाठी रविवारी रेल्वे प्रशासनाने शटडाऊन दिले आहे. त्यानुसार सोलापूर केंद्रावर सायंकाळी सात वाजता आरक्षण केंद्र बंद करण्यात आली आहेत.यातून ई-तिकीट सेवेला वगळण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार नाही.
- के. जयशंकर, वाणिज्य विभागीय व्यवस्थापक