आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे दुहेरीकरणास सहा महिन्यांचा होईल विलंब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर रेल्वे विभागात महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून दुहेरीकरणाच्या कामाकडे पाहिले जाते. परंतु प्रशासनासमोर आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे दुहेरीकणास र्मयादित कालावधीपेक्षा सहा महिन्यांचा विलंब लागणार आहे. परिणामी प्रवाशी गतिमान सेवाही लांबणार आहे. सोलापूर डीआरएम कार्यालयात रेल्वे प्रशासन व रेल्वे विकास निगमच्या (आरव्हीएनएल) अधिकार्‍यांच्या बैठकीत ही बाब समोर आली.

मनमाड ते वाडीदरम्यान रेल्वे रुळाचे दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे तीन टप्प्यांत काम सुरू आहे. कामची सुरुवात ऑगस्ट 2011 मध्ये झाली. यासाठी रेल्वे बोर्डाने एशियन बँकेकडून 1600 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. मनमाड ते दौंड, सोलापूर ते मोहोळ, भिगवण ते दौंड या मार्गाचे दुहेरीकरण झाले आहे. सध्या मोहोळ ते भिगवण या 127 किमी. चे व गुलबर्गा ते होटगी दरम्यानचे काम सुरू आहे. या कामासाठी रेल्वे प्रशासनाने 42 महिन्यांचा अवधी एजन्सीला दिला होता. मात्र होटगी ते गुलबर्गा रेल्वे मार्गावरील स्लायडिंगमुळे व मोहोळ ते भिगवण या रेल्वे मार्गावरील काही स्थानके एकाच उंचीवर आणण्याचे काम करावे लागत आहे. त्यामुळे रेल्वे दुहेरीकरणास सहा महिन्यांचा अतिरिक्त अवधी लागणार आहे.

प्रमुख उपस्थिती
बैठकीत मुख्य प्रोजेक्ट व्यवस्थापक अनुप अग्रवाल, साहाय्यक सरव्यवस्थापक डी. एन.काटे, उप सरव्यवस्थापक पी. के. चतुर्वेदी, सोलापूर रेल्वेचे व्यवस्थापक जॉन थॉमस, सुशील गायकवाड, राजू भडके, वरिष्ठ सिग्नल अभियंता सुदीप श्रीवास्तव, के. आर. डांगे, डी. डी. लोलगे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कामाचे ठिकाण लागणारा अवधी
मोहोळ ते भिगवण (एकूण काम) डिसेंबर 2016
मोहोळ ते वाकाव डिसेंबर 2014
वाकाव ते कुर्डुवाडी जून 2015
कुर्डुवाडी ते जेऊर डिसेंबर 2015
जेऊर ते वाशिंबे जून 2016
वाशिंबे ते भिगवण डिसेंबर 2016
होटगी ते गुलबर्गा (एकूण काम) मार्च 2016
होटगी ते अक्कलकोट ऑक्टोबर 2014
अक्कलकोट ते दुधनी मे 2015
दुधनी ते गाणगापूर नोव्हेंबर 2015
गाणगापूर ते गुलबर्गा मे 2016