आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटिशकालीन सिग्नलला आता ‘रेड सिग्नल’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- पूर्वी रेल्वेसाठी दांड्याचा सिग्नल असायचा. तो आडवा असेल तर लाल आणि उभा असेल तर हिरवा सिग्नल समजला जायचा. ही पद्धत आजही सोलापूर विभागातील पंढरपूर व विसापूर येथे अमलात होती. आता या जुन्या पद्धतीच्या सिग्नल यंत्रणेला रेड सिग्नल मिळाला. कारण रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत हायटेक बदल होत आहे. आता पॅनल पद्धत वापरण्यात येणार आहे. येथे विविध ठिकाणी एकूण 17 सिग्नल उभारण्यात येत आहे.
नीतीशकुमारांची दूरदृष्टी
रेल्वे मंत्री नीतीशकुमार यांच्या काळात भारतीय रेल्वेत फार मोठे बदल झाले. त्यांनी सिग्नल यंत्रणेत फार मोठे बदल घडवून आणले. स्पेशल रेल्वे सेप्टी फंड यासाठी त्यांनी प्रत्येक आरक्षित तिकिटावर 2 रुपये आकारले. 2003 ते 2013 या वर्षासाठी त्यांनी हा फंड गोळा करण्याचे ठरवले. त्यानुसार आतापर्यंत 31 हजार 835 कोटी रुपयांचा निधी भारतीय रेल्वेकडे जमा झाला आहे.
जुनी पद्धत कशी
रेल्वेगाडी येताना व जाताना कर्मचार्‍यांना सिंग्नल यंत्रणा असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन खटके ओढावे लागत होते. जो सिग्नल द्यायचा आहे तसा खटका ओढण्यात येत होता. त्यामुळे कर्मचार्‍यांना उन्हात व पावसाळ्यात थांबावे लागत असे. आता हा त्रास थांबणार आहे.
नवीन पद्धतीनुसार..
सिग्नल यंत्रणेच्या आधुनिक व नवीन पद्धतीनुसार गाडींना सिग्नल देण्याची यंत्रणा पॅनलवर देण्यात आली आहे. पॅनलवर बटण दाबताच गाडीस हवा असलेला योग्य तो सिग्नल मिळतो. त्यासाठी कर्मचार्‍यांना ट्रॅकवर जाण्याची गरज नाही. ऑपरेटिंग केबिनमध्ये बसून त्यांना हे कार्य करता येते. तेथे प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही. कर्मचार्‍यांच्या दृष्टीने हे सोयीस्कर आहे.
आधुनिक यंत्रणेमुळे कामात गती येणार
सोलापूर रेल्वे विभागातील हे शेवटचे स्थानक होते जे आधुनिक बदल करणे गरजेचे होते. गाड्यांच्या ऑपरेटिंगच्या दृष्टीने हा महत्त्वाचा बदल आहे. त्यामुळे ऑपरेटिंगच्या कामात गतिमानता येणार आहे. तसेच अपघात टाळणे शक्य होणार आहे. या यंत्रणेमुळे अवघ्या 30 सेकंदांत गाडीच्या चालकास योग्य तो सिग्नल मिळेल. त्यामुळे रेल्वेच्या वाहतुकीच्या कामात गती येणार आहे.
-सुशील गायकवाड, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक
या निधीचा वापर यासाठी
>सिग्नल आधुनिक करणे
>पूर्वी रेल्वेची ट्रॅक लाइन ही लाकडी स्लिपरची असायची. ती बदलून सिमेंटचे स्लिपर टाकण्यात आले. यामुळे वृक्षतोड थांबली.
>भारतात 140 स्पेशल ट्रेनची निर्मिती. ज्या वेळी अपघात होतो त्यावेळी या घटनास्थळी धावतात. याचा वेग ताशी 140 किमी असतो.
>अपघात स्थळावरून सर्व यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सॅटेलाइट फोनची निर्मिती.
>प्रवाशांच्या सोयीसाठी व आपत्काळासाठी पॅरामेंटरी फोर्सची स्थापना.
>आदी विविध कामांच्या पूर्ततेसाठी या निधीचा वापर.