आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेस्थानकावर अतिक्रमण, मास्टर प्लॅन आले अडचणीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर रेल्वे स्थानकाच्या मालधक्क्याच्या फलाटावर गेल्या सहा-सात महिन्यात अचानक एक थडगे उभारण्यात आले आहे. यामुळे रेल्वेच्या बहुचर्चित मास्टर प्लॅनला आगामी काळात मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी स्थानकासमोरील पार्किंगच्या सुरक्षा भिंतीलगत एक म्हसोबाचे छोटेसे मंदिरही उभारण्यात आले आहे. सोलापूरचे रेल्वे प्रशासन मात्र या अतिक्रमणाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.
रेल्वे स्थानकावर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या बाजूने मालधक्क्याचा फलाट आहे. तीन ते चार वर्षांपूर्वी मालधक्का बाळे येथे हलवण्यात आला. त्यामुळे जुन्या मालधक्क्याच्या फलाटावरील वर्दळ कमी झाली. याचा फायदा घेत काही लोकांनी तीन महिन्यांपूर्वी या फलाटावर एक कृत्रमि थडगे बनवले. हळूहळू त्या थडग्याला दर्ग्याचे रूप देण्याचाही प्रकार सुरू झाला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून त्या थडग्यावर दिवा, अगरबत्ती लावण्याचा प्रकारही सुरू झाला आहे.
तसेच, गेल्या महिन्याभरातच रेल्वे स्टेशनसमोरील कार पार्किंगच्या सुरक्षा भिंतीला लागून बाहेरच्या बाजूला परसिरातील काही लोकांनी एक लहानसे म्हसोबा मंदिर उभारले आहे. पुढील काळात हे मंदलि वाहतुकीला अडथळा ठरण्याची शक्यता आहे.
मास्टर प्लॅनची सद्यस्थिती
सोलापूर रेल्वे विभागाने तयार केलेला मास्टर प्लॅन मध्य रेल्वेच्या मंजुरीनंतर अंतमि मंजुरीसाठी म्हणजेच निधीसाठी रेल्वे बोर्डाकडे विचाराधीन आहे. या विकासकामासाठी लवकरात लवकर निधी मिळावा म्हणून सोलापूर रेल्वे विभाग दलि्ली स्तरावर प्रयत्न करत आहे. परंतु, मास्टर प्लॅनच्या मुळावर उठलेल्या अतिक्रमणाकडे मात्र रेल्वे प्रशासनाचे लक्ष नाही.

ए वनचा दर्जा कागदावरच
रेल्वेच्या प्रवाशांना चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी सोलापूर रेल्वे प्रशासनाने बंद झालेल्या मालधक्क्याच्या ठिकाणी तब्बल साडेतीन कोटी रुपयांचा मास्टर प्लॅन तयार केला आहे. निधीच्या प्रतीक्षेत असलेले मास्टर प्लॅन स्थानकावरील ताज्या अतिक्रमाणामुळे अडचणीत आला आहे. रेल्वे प्रशासन मात्र या अतिक्रमणाकडे डोळेझाक करत आहे. नुकतेच सुरु झालेले हे अतिक्रमण वेळीच हटवण्यात आले नाही तर पुढील काळात मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे मास्टर प्लॅन रखडला तर सोलापूर रेल्वे स्थानकाला मिळालेला ए वन रेल्वे स्थानकाचा दर्जा केवळ कागदावरच राहील, अशी शक्यता आहे.
कसा आहे मास्टर प्लॅन
१. सध्याचे आरक्षण केंद्र बंद करून जुन्या मालधक्क्याच्या जागी १७ खिडकींचे मोठे आरक्षण केंद्र होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना ५ ते १० मिनिटांत आरक्षित तिकीट मिळेल.
२. जागा प्रशस्त असल्याने दुचाकी व चारचाकीसाठी पार्किंग तयार केले जाईल.
३. सामान्य प्रवाशांसाठी सध्या वेटिंग रूम नाही. जुन्या मालधक्क्याच्या जागी ती तयार केली जाणार आहे.
४. ए वन स्थानकाचा दर्जा मिळाल्यानंतर ज्या सुविधा दलि्या जातात त्या सर्व सुविधा देण्याची योजना आहे.
रस्त्यावर प्रार्थनास्थळ नकोच
मागील काही दिवसांत रेल्वे स्थानक आणि परसिरात अतिक्रमण झाले आहे. निर्णय घेण्यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू आहे. खबरदारी घेण्याचे आदेश रेल्वे सुरक्षा बलाला देण्यात आले आहे.
नर्मदेश्वर झा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक
धार्मिकतेच्या नावाखाली रस्त्यावर प्रार्थनास्थळांना आणणे योग्य नाहीच. आपापल्या धार्मिक स्थळात राहून व मर्यादा सांभाळून धार्मिकता जपली पाहिजे, तरच धार्मिक स्थळांचे पावित्र्य टिकेल. त्याला वदि्रूप स्वरूप येता कामा नाही.
जयंत फडके गुरुजी, सोलापूर

धार्मिक स्थळांचे पावित्र्य राखा
धार्मिक स्थळ म्हणजे पवित्र जागा. परंतु, अलीकडे शहरात सार्वजनिक आणि शासकीय जागा हडपण्यासाठी धार्मिक स्थळांची उभारणी होत आहेत. कुठे स्वच्छतागृह पाडून तर कुठे उकिरडे हटवून मंदिर उभारणी होत आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या मधोमध तर काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला, शासनाच्या जमविींवर कृत्रमि थडगे उभारून त्याला दर्ग्याचे रूप देण्यात येत आहे. यामुळे धार्मिक स्थळाचे पावित्र्य राखले जाण्याची शक्यता नाहीच, शविाय अशी धार्मिक स्थळे अशांतीला कारणीभूत ठरू शकतात. अशी अतिक्रमणे फोफावत रािहली तर नंतरच्या काळात राजकीय मुद्दे बनून सामाजिक तेढही निर्माण होऊ शकते.