आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात दाजीपेठ पोस्टातून रेल्वे तिकिटे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शहरातील पूर्व भागातील दाजी पेठ येथील पोस्ट ऑफिसमध्ये जानेवारी महिन्याच्या अखेरीस रेल्वेचे आरक्षित तिकीट सेवा उपलब्ध होणार आहे. या सुविधेमुळे या भागातील नागरिकांची सोय होणार आहे. त्यांना आता आरक्षण काढण्याकरिता रेल्वे स्थानकावरील आरक्षण केंद्रात यावे लागणार नाही.

गेल्या दीड वर्षापासून शहरातील पोस्ट ऑफिसमधून रेल्वेची आरक्षित तिकिटे मिळावीत यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर या प्रयत्नांना यश आले असून जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात ही सेवा सुरू होईल. लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नामुळे रेल्वे मंत्रालयाकडून दाजी पेठेतील पोस्ट ऑफिसमधून रेल्वे तिकीट देण्यास मंजुरी मिळाली आहे.

दोन दिवसांपूर्वी तिकीट आरक्षणासाठी आवश्यक असलेले संगणक, पिंट्रर अन्य सामग्री सोलापुरात दाखल झालेली आहे. लवकरच रेल्वेच्या वतीने पोस्टाच्या कर्मचार्‍यांना तिकीट काढण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण रेल्वे आरक्षण केंद्रात दिले जाणार आहे. दाजी पेठ पोस्ट ऑफिसमधून रेल्वे तिकिटे सुरू व्हावीत म्हणून केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रयत्न केले होते. तसेच रेल्वे प्रशासनाने या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करून ही सेवा अखेर मंजूर करून घेतली. यामुळे पूर्व भागातील नागरिकांची मोठी सोय होणार आहे.

रेल्वे प्रशासनाचे प्रयत्न
पूर्व भागातील नागरिकांची यामुळे चांगली सोय होणार आहे. त्यांना आरक्षित तिकिटांसाठी रेल्वे स्थानकावरील आरक्षण कें द्रावर येण्याची गरज भासणार नाही. हे आरक्षण केंद्र सुरू व्हावे म्हणून रेल्वे प्रशासनाने खूप प्रयत्न केले सुशील गायकवाड, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर