आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसएमएसने काढू शकाल रेल्वेचे आरक्षित तिकीट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - रेल्वे तिकीट काढण्यासाठी आरक्षण केंद्रातील रांगा, टोकनसाठी धडपड, तिकीटासाठी ताटकळत थांबणे अशा प्रकाराला कंटाळलेल्यांना एक खुषखबर आहे. 1 जुलैपासून इंडियन रेल्वे केटरिंग अँन्ड टुरिझम कार्पोरेशनच्या वतीने मोबाइलवरून एसएमएस पाठवून तिकीट आरक्षित करता येणार आहे. यासाठी तुमचा मोबाइल आणि बॅंक खात्याच्या क्रमांकाची नोंद आयआरसीटीसीच्या कार्यालयाकडे असली पाहिजे. येत्या एक जुलैपासून देशात ही सेवा लागू होईल. या व्यवहारासाठी मोबाइल धारकांकडून अतिरिक्त सहा रुपये शुल्क तिकिटाव्यतिरिक्त आकारण्यात येणार आहे.

आपल्या मोबाइलमध्ये इंटरनेट सुविधा नसेल तरीही आपण एका विशिष्ट क्रमांकावर एसएमएस करून या सुविधेचा लाभ घेऊ शकता.