आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Railway Ticket News In Marathi, Ticket We Can Cancel After 3 Days

रेल्वे सुटली... नो टेन्शन, तिकीट रद्द करा दिवसांत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - अनेकदा काही कारणाने आपल्याला रेल्वे प्रवास अचानक रद्द करावा लागतो अथवा धावपळीत गाडी सुटून जाते. अशा वेळी आरक्षित तिकीट रद्द करणे ही डोकेदुखी ठरते. कारण तिकीट रद्द करण्यासाठी पुढे केवळ दोन तासांचाच अवधी प्रवाशांच्या हाती असतो. अशा परिस्थितीत रेल्वे प्रवाशी तिकीट रद्द करण्याच्या भानगडीत फारसे पडत नाहीत. मात्र यापुढील काळात अशा प्रवासांसाठी आता खुश खबर आहे.
रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकावरून काढलेले आरक्षित तिकीट रद्द करण्याचा कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी गेल्यानंतरची दोन तासांची असलेली मुदत आता दिवसांवर आणली आहे. रेल्वे बोर्डाने घेतलेला हा निर्णय रेल्वेच्या प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर ठरणारा आहे. येत्या काही दिवसांत हा नियम देशातील सर्व आरक्षण केंद्रांवर लागू होईल, असे सांगण्यात आले.

सध्याच्या रेल्वे नियमाप्रमाणे रेल्वे सुटल्यानंतर गाडी गेल्याच्या दोन तासांच्या आत आरक्षित तिकीट रद्द करणे गरजेचे असते. दोन तासांनतर तिकीट रद्द करता येत नाही. परंतु यापुढील काळात ही जाचक अट दूर होणार आहे. रेल्वे प्रशासनाने तिकीट रद्द करण्याचा कालावधी वाढवलेला असला तरी रद्द करण्याचे शुल्क लागू असणार आहे. दोन तासांच्या आत तिकीट रद्द केले तर आरक्षणाचे शुल्क वगळून तिकिटाच्या रकमेचा परतावा दिला जाईल. आणि तासांनंतर ते दिवसांत तिकीट रद्द केल्यास तिकिटाची अर्धी रक्कम रद्द करून उर्वरित रक्कम प्रवाशांना दिली जाणार आहे.

प्रवाशी हित
आरक्षित तिकीट रद्द करण्याबाबत रेल्वे बोर्डाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दोन तासांची मुदत आता तीन दिवसांपर्यंत वाढविण्याचा निर्णय झाला आहे. तो लवकरच सर्वत्र लागू होईल. नरेंद्रपाटील, मुख्यजनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे , मुंबई.

हुतात्मा सिद्धेश्वरच्या प्रवाशांची सोय
सोलापूरस्थानकावरून हुतात्मा एक्स्प्रेस ही सकाळी साडेसहाला तर सिद्धेश्वर एक्स्प्रेस रात्री १०.४५ ला सुटते. दोन्ही गाड्यांच्या वेळेत रेल्वे आरक्षण केंद्र बंद असते. त्यामुळे गाडी चुकलेल्या अथवा प्रवास रद्द झालेल्या आरक्षित तिकीटधारकांना आपले तिकीट रद्द करता येत नव्हते. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत होते. पण नव्या नियमामुळे त्यांना आरक्षित तिकीट रद्द करण्यासाठी बराच अवधी मिळणार आहे