आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेची तत्काळ तिकिटे आता ‘तत्काळ’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- भारतीय रेल्वेने तत्काळ तिकीट घेऊ इच्छिणार्‍यांसाठी स्वतंत्र लिंक उपलब्ध करून दिल्याने आता तत्काळ तिकिटे खर्‍या अर्थाने तत्काळ मिळणार आहेत. रेल्वेचा उन्हाळी सुटीचा हंगाम तोंडावर आला आला आहे. दरम्यान, भारतात रोज लाखो प्रवासी इ तिकीट काढण्यासाठी आयआरसीटीसीच्या संकेतस्थळाचा वापर करतात. जशी मागणी आरक्षित तिकिटांसाठी असते तशीच तत्काळ तिकिटासाठीही असते. दोन्ही प्रकारचे तिकीट काढण्यासाठी एकाच संकेतस्थळावरील लिंकचा वापर करण्यात येतो. त्यामुळे हे संकेतस्थळ अनेकदा जाम होते. परिणामी रेल्वे प्रवाशांना तिकीट मिळवण्यासाठी बरीच कसरत करावी लागते. यामध्ये त्यांचा वेळही वाया जातो.

प्रवाशांची अडचण ध्यानात घेऊन आयआरसीटीसीने तत्काळ तिकीटधारकांसाठी स्वतंत्र लिंक तयार केली. त्यामुळे आयआरसीटीसी लिंकवरील ताण कमी होईल. परिणामी तत्काळ तिकीट इच्छुकांना तत्काळचे तिकीट खर्‍या अर्थाने तत्काळ मिळणार आहेत. आयआरसीटीसी लाईट ही नवी लिंक आता भेटीला आली आहे. ज्यांना केवळ आरक्षित तिकीट हवे आहे, ते नेहमीप्रमाणे आयआरसीटीसीच्या संकेतस्थळाचा व ज्यांना तत्काळ तिकीट हवे त्यांना ‘लाइट’वर तिकीट बुक करता येईल, अशी माहिती आयआरटीसीचे सरव्यवस्थापक प्रदीप कुंडू यांनी दिली.