आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पीक्यूआरएस'मुळे रेल्वेट्रॅकच्या कामाला आलीय एक्स्प्रेस गती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- रेल्वेगाड्या धावण्यासाठी अनेक बाबी महत्त्वाच्या ठरतात. त्यात सर्वात महत्त्वाचे आहे उपलब्ध असणारा ट्रॅक. ट्रॅकच्या मजबुतीवरच गाड्यांचे धावणे अवलंबून असते. ट्रॅकच्या मांडणीत किंवा त्याच्या सुरक्षिततेत थोडी जरी बाधा निर्माण झाली तर अपघात ठरलेलाच असतो. या पार्श्वभूमीवर सोलापूर रेल्वे प्रशासनाने सोलापूर विभागातील रेल्वे रुळ बदलण्याचे काम हाती घेतले आहे. ट्रॅक बदलणे ही नित्याचीच बाब असली तरीही यात पूर्वीपेक्षा अधिक गतिमानता यावी म्हणून पीक्यूआरएस या आधुनिक यंत्राद्वारे ट्रॅक बदलले जात आहे.
पीक्यूआरएस म्हणजे प्लेझर क्विक रिले सिस्टीम. फेबुवारी २०१४ पासून त्याचे काम सुरू झाले. याने अत्यंत कमी वेळात ट्रॅक बदलण्यात येतो. एका तासात मनुष्यबळ लावून जेवढे काम होते त्याच्या सहा पट काम "पीक्यूआरएस'ने होते. या मशिनने सोलापुरात एकूण १२० तास काम केले आहे. १३.५ किमीचे काम पूर्ण झाले आहे. "पीक्यूआरएस'ने ट्रॅक बदलण्याचे काम आणखी दोन महिने सुरू राहील. ट्रॅक बदलल्यामुळे ते पूर्वीपेक्षा अधिक भार सहन करू शकणार आहे. गाड्यांच्या गतीसाठी हे चांगले आहे. नरपतिसंह, वरिष्ठिवभागीय परिचालन व्यवस्थापक