आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदिमातेच्या मिरवणुकांत पावसाने वाढवला जल्लोष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- दशमीनिमित्त रविवारी आदिशक्तीमातेच्या मिरवणुका जल्लोषात निघाल्या. बेधुंद होऊन नाचणार्‍या कार्यकर्त्यांचा उत्साह अचानक अलेल्या पावसाने अधिकच वाढवला. 18 नवरात्रोत्सव मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. तुळजापूर वेशीतील अग्रमानिनी मंडळाने आणलेल्या ‘अजय-अतुल लाईव्ह कॉन्सर्ट’मध्ये वाद्ये वाजवणार्‍या ‘मोरया’ टीम लक्ष वेधत होती.

महापौरांच्या हस्ते पूजा
मंगळवार पेठेत महापौर अलका राठोड यांच्या हस्ते जय भवानी तरुण मंडळाच्या मूर्तीची पूजा दुपारी साडेचारच्या सुमारास झाली. या वेळी उत्सव अध्यक्ष आनंद मुस्तारे, काँग्रेसचे शहराध्यक्ष धर्मा भोसले, नगरसेवक दिलीप कोल्हे, मध्यवर्तीचे ट्रस्टी अध्यक्ष शिवाजी पिसे, सुनील रसाळे, अशोक कलशेट्टी, भास्कर आडकी, सचिन धोत्रे आदी उपस्थित होते.

गुलाल गडप
गुलाल. अरगजाचे प्रमाण अत्यंत कमी दिसले. बहुतांश मंडळांनी पाकळ्या, चुरमुरे उडवणे पसंत केल्याचे दिसले.

पालखी सोहळा
दुपारी दोनच्या सुमारास मध्यवर्तीच्या मिरवणुकांना सुरुवात झाली. सोलापूरचे र्शद्धास्थान असणार्‍या रूपा भवानीदेवीची पालखी साडेचारच्या सुमारास विधिवत पूजनानंतर निघाली. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.

‘लेक वाचवा’ मोहीम
भवानी पेठेतील विजयालक्ष्मी मंडळ व सुदर्शन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या पथकातील लहान मुलींनी टिपरीचा खेळ सादर केला. ‘लेक वाचवा’ संदेश देणारा फलक लावला.

काचेची सजावट
तुळजापूर वेशीतील ढोर गल्ली परिसरातील शुभमंगल माता मंडळाचा वाहनावरील देखावा आकर्षक ठरला. काचेच्या झुंबराची सजावट आणि वैविध्यपूर्ण विद्युतरोषणाईने लक्ष वेधले.

लेझीमचा खेळ
सगळ्याच मंडळांच्या पथकांनी लेझीमचे सादरीकरण केले. विविधरंगी खास पोषाखातही मंडळी फेर धरत होती. शाहीरवस्ती परिसरातील जागृतीमाता मंडळाने लेझीमचा बहारदार खेळ सादर केला. जवळपास 500 कार्यकर्ते पांढरा झब्बा आणि केशरी शेला गळ्यात अडकवून बेफान होऊन नाचत होते.

तुळजापूर वेसमधील अग्रमानिनी मंडळाने संगीतकार अजय-अतुल यांच्या वाद्यवृंद चमूतील एक संघ सोलापुरात आणला. चमूत लहान मुले, मुली, युवा-युवतीही होत्या. 80 वादक वाद्ये वाजवित होते.