आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाळी पाऊस : पत्रे उडाल्याने 2 ठार, 4 जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मंगळवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसाने महिलांचा मृत्यू झाला तर जण जखमी झाले आहेत. अनेक ठिकाणी वीज कोसळून जनावरांचा मृत्यू झाला आहे. वादळ वार्‍यामुळे घरे, शाळा जनावरांच्या गोठ्यावरचे पत्रे उडून गेले आहेत. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. शहर परिसरात सर्वाधिक १८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

वादळ वार्‍याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले असून सायंकाळी उशिरापर्यंत नुकसानीची माहिती पोहचली नव्हती. मंगळवारी रात्रीच्या पावसाने रविवार पेठ येथे घराची भिंत पडल्याने सिंधूबाई बाबूराव ताकमोगे (वय ७०) यांचा मृत्यू झाला. उत्तर सोलापूर तालुक्यातील बाणेगाव येथे वीज कोसळल्याने वंदना माणिक थोरात (वय ३०) यांचा मृत्यू झाला आहे.

बाणेगाव येथे माणिक थोरात (वय ३५), देवी चंद्रमोहन (वय ३०) तर रविवार पेठ येथे राजू यादव मनिषा यादव जखमी झाले आहेत. याशिवाय वीज कोसळल्याने जनावंराचा मृत्यू झाला आहे. यामध्ये धामणगाव येथे बैल, मुस्ती येथे म्हैस, कुंभारी येथे बैल म्हैस तर मुळेगाव येथे बैलांचा मृत्यू झाला अशी नोंद झाली आहे. अवकाळी पावसाने उत्तर सोलापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामध्ये शहरातील हद्दवाढ भाग ग्रामीणमध्ये घरांवरचे पत्रे उडून जाणे, घरांच्या भिंती पडण्याचे प्रमाण अधिक आहे.

पाचच दिवसांपूर्वी बसवले होते पत्रे
बचत गटातून पाच हजार काढून पत्रे बसवून घेतले. याला पाच दिवस उलटण्याआधीच झाड उन्मळून घरावर पडले. शेजार्‍यांनी आम्हाला शिडी लावून बाहेर काढले. माझे पती घरासमोर पलंगवर बसले होते. मी त्यांना घरात घेऊन गेले नसते तर मोठा अपघात झाला असता.नगरसेवकांना सांगितले तर मी काय करू, असे उत्तर मिळाले. आमदार प्रणिती शिंदे यांचे कार्यकर्ते येऊन नोंदणी करून गेले.” यल्लूबाई इंगळे, गांधीनगर, अक्कलकोट

तालुका निहाय पाऊस
उत्तर सोलापूर १७.९८, दक्षिण सोलापूर ५.७१, बार्शी ३, अक्कलकोट ९.११, मोहोळ १.२५. इतर तालुक्यात पाऊस झाला नसल्याची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयाकडे झाली आहे.