आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाळी पावसासमोर मनपाची यंत्रणा ठरली कुचकामी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी दुपारपर्यंत विडी घरकुलमध्ये रस्त्यांवरील तारांवर पत्रे लोंबकळत होते. अशा धोकादायक स्थितीतून रहदारी सुरू होती. - Divya Marathi
बुधवारी दुपारपर्यंत विडी घरकुलमध्ये रस्त्यांवरील तारांवर पत्रे लोंबकळत होते. अशा धोकादायक स्थितीतून रहदारी सुरू होती.
सोलापूर - मंगळवारी संध्याकाळी कोसळलेल्या अवकाळी पावसाने सोलापूर शहर आणि परिसरात मोठा उत्पात माजवला. या तडाख्यात अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली. पण मदतीसाठी वाट पाहणार्‍या पीडित शहरवासीयांना पालिकेची आपातकालीन यंत्रणा कुठेच दिसली नसली तरी अनेक जण आपले संसार सावरण्यात व्यस्त होते. दरम्यान, महसूलने पंचनाम्याचे आदेश दिले.

दिवसभर रखरखते ऊन त्यामुळे सायंकाळी हवामानात अचानक बदल झाला. सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने झोडपून काढले. वार्‍यात अनेकांच्या घरावरचे पत्रे उडाल्यामुळे त्यांचे संसार उघड्यावर आले. हद्दवाढ भागात झाडे उन्मळून पडली. विजेच्या तारा रस्त्यावर लोंबकळल्या.

शेळगी भागात घरांवरचे पत्रे उडून मैदानात विखुरले, विडी घरकुल भागातील घरात पाणी शिरले. एकाच्या घरावरचे पत्रे दुसर्‍याच्या घरावर आणि विजेच्या तारांवर पडले. सुनील नगर, शांती नगर, विजापूर नाका झोपडपट्टी, नीलम नगर, नई जिंदगी भागात पत्र्यांची घरे जास्त संख्येने आहेत. याभागात अनेकांच्या घरावरचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले. शेटे वस्ती, निराळे वस्ती येथे घरात पाणी शिरले, गावठाण भागात पाणी साचले होते.

वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न
वादळवारा सुरू होताच काही अपघात होऊ नये अशी दक्षता घेण्यासाठी वीज पुरवठा खंडित केला जातो. मंगळवारी रात्री असेच करण्यात आले. शहराच्या गावठाण भागात मंगळवारी मध्यरात्री वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला. हद्दवाढ भागात टप्प्याटप्प्याने पूर्ववत केला जात आहे. शहर आणि हद्दवाढ भागातील वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे.

ड्रेनेजलाइन स्वच्छ केल्याने अनेकांच्या घरात शिरले पाणी
विडी घरकुल आणि अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरात ड्रेनेज लाइन आणि सांडपाणी लाइन वेळोवेळी स्वच्छ केली नाही त्यामुळे लाइन तुंबली, रस्त्यावर आणि लोकांच्या घरात पाणी शिरले आणि नागरिकांना त्रास झाला. सांडपाण्याच्या लाइनमधील घाण पाणी घरात शिरल्यामुळे घरात दुर्गंधी पसरली होती. यामुळे नागरिकाच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासंदर्भात अधिकार्‍यांना सूचना केल्या. ड्रेनेज लाइन आणि नाल्यांची पाहणी करून तोही प्रश्न सोडवू.” विजयकुमार काळम-पाटील, आयुक्त

शहरात ८०, जिल्ह्यात ४५० विद्युत खांब पडले. महावितरणचे १२५ कर्मचारी काम करत आहेत. दोन दिवसांत विद्युत पुरवठा सुरळीत होईल.” एस.बी. साळे, अधीक्षक अभियंता