आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Rajan Patil, The Board Of Directors Responsible For The Loss

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजन पाटील, संचालक मंडळ नुकसानीला जबाबदार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहोळ- न्यू व्हिन्टेज टिश्यू टेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला सन २००० ते २००५ दरम्यान टिश्यू कल्चरची ऊस रोपे पुरवता कोटी ३२ लाख १५ हजार ३८९ रुपये उचल रक्कम दिल्यामुळे तेवढ्या रकमेचे भीमा कारखान्याचे आर्थिक नुकसान झाले. त्यासाठी तत्कालीन अध्यक्ष राजन पाटील यांचे संचालक मंडळास दोषी ठरवत ही रक्कम त्यांच्याकडून १५ टक्के व्याजाने वसूल करण्याचा प्रादेशिक सहसंचालकाचा आदेश राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कायम केला आहे, अशी माहिती भीमा कारखन्याचे चेअरमन खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या आदेशामुळे तत्कालीन संचालक मंडळातील माजी आमदार सुधाकर परिचारक आणि राजन पाटील या मातब्बर संचालकांना कलम ८८ अन्वये पुढील वर्षे कुठल्याही सहकारी संस्थेची निवडण्ूक लढवता येणार नाही. हा आदेश १८ मे रोजी िदला.

ऑक्टोबर २००२ रोजी रोजी १० लाख टिश्यू ऊस रोपे पुरवण्याबाबतचा करार तत्कालीन संचालक मंडळाने केला होता. प्रादेशिक साखर सहसंचालकांनी ८३ कलमाअन्वये चौकशी केली होती. चौकशीत तत्कालीन संचालक मंडळास कोटी ३२ लाख १५ हजार ३८९ रुपये आर्थिक नुकसानीस जबाबदार धरले होते. तेव्हा संचालक मंडळाने तत्कालीन सहकारमंत्री पतंगराव कदम आणि हर्षवर्धन पाटील यांच्याकडून अपिलास स्थगिती आणली होती. विद्यमान सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे चाललेल्या सुनावणीत या संचालक मंडळाने बँक गँरटी घेता करारपत्र केले.
चुकीच्या पद्धतीने रोपे घेता कंपनीला रक्कम अदा केल्याचे निदर्शनास आले. त्याचबरोबर रक्कम वसूलही झालेली नाही. या बाबींचा विचार करून कलम ८८ अंतर्गत चौकशीदरम्यान अधिकाऱ्यांनी संचालक मंडळ, कार्यकारी संचालक, ऊस विकास अधिकारी अशा १७ जणांना जबाबदार धरले आहे.

चौकशी अधिकारी एस. जी. परदेशी यांचा निष्कर्ष आदेश योग्य ठरवत तत्कालीन संचालक मंडळाचे अपिल सहकारमंत्री पाटील यांनी नामंजूर केले. त्यामुळे या रकमेवर जुलै २०१२ पासून १५ टक्के व्याजासह वरील रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले आहेत.
- या निकालामुळे जिल्ह्यासह राज्यातील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विरोधकांनी आता भीमाची निवडणूक लढवू नये. सहकारात पारदर्शकतेचा आव आणणाऱ्या नेत्यांचा कारभार या निकालाने समोर आला आहे. भीमाची साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करावी यातच सभासद शेतकऱ्यांचे हित आहे.
धनंजय महाडिक, चेअरमन, भीमा कारखाना
- भीमा सहकारी साखर कारखान्याच्या िनकालाची प्रत अजून आमच्यापर्यंत पोहोचली नाही. निकालाची प्रत मिळल्यानंतरच त्याचा अभ्यास करून वकिलांशी चर्चा करू. मग त्यासंदर्भात पुढील पुढील कार्यवाही करू.
राजन पाटील, तत्कालीन अध्यक्ष, भीमा कारखाना, मोहोळ