आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajendra Mirgane Interested To Contest Osmanabad Loksabha Election From Shivsena

उस्मानाबाद लोकसभेसाठी शिवसेनेकडून इच्छुक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बार्शी- सामाजिक कार्य करत असताना येणार्‍या अडचणींवर मात करण्यासाठी त्यास राजकारणाची जोड दिल्यास ते अधिक सक्षमपणे करता येईल, याच भावनेतून व शिवसैनिकांच्या आग्रहाखातर मी शिवसेनेकडून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे आरएसएम समाजसेवा संस्थेचे प्रमुख राजेंद्र मिरगणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. येथील तेलगिरणी चौकातील आरएसएम हाईट्स येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपली राजकीय भूमिका विषद केली. या वेळी अविनाश पोकळे, शिरीष घळके, पंडित मिरगणे आदी उपस्थित होते.

मिरगणे म्हणाले, सन 1992 पासूनच आपण शिवसेनेशी एकनिष्ठ राहून कार्य केलेले आहे. या काळात सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, विधानसभा, लोकसभा ज्या निवडणुका झाल्या. त्यावेळी प्रचार कार्यामध्ये पूर्णपणे सहभागी राहिलो. सन 2006 ते 2011 या काळात आपण राजकारणापासून अलिप्त होतो. मागील दोन वर्षांपासून मित्रपरिवाराच्या आग्रहाने तसेच सामाजिक बांधिलकी ओळखून सामाजिक कार्यास सुरुवात केली. आरएसएम संस्थेच्या माध्यमातून बार्शी तालुक्यात तसेच उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवले.

भूम, परंडा, कळंब, बार्शी आदी ठिकाणी मोफत पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रे सुरू केली. दुष्काळग्रस्तांसाठी 82 टँकरच्या माध्यमातून टंचाईग्रस्त भागात मोफत पाणीपुरवठा केला. मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले. जलपुनर्भरणाचा प्रयत्न म्हणून आरएसएम जलसंधारण पॅटर्न ठिकठिकाणी राबवला, असे ते म्हणाले.

राष्ट्रवादीशी काय संबंध
मधल्या काळात राष्ट्रवादी नेत्याशी असलेल्या जवळीकतेसंदर्भात विचारले असता उद्योगाच्या निमित्ताने नेत्यांचा संपर्क आला इतकेच. पण आपण राबवलेल्या कार्यक्रमात कधीही राष्ट्रवादीच्या बॅनरचा वापर केला नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

उमेदवारीसाठी मागणी
शिवसेनेकडे उमेदवारीची मागणी केली आहे. परंतु जरी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी आपल्याशिवाय अन्य कोणाला उमेदवारी दिली. तरी आपण तितक्याच हिरीरीने प्रचार करू, असेही मिरगणे यांनी सांगितले.