आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वडिलांच्या प्रेरणेने चॅलेंज स्वीकारून काम केले - पोलिस अधीक्षक राजेश प्रधान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापुरात एसपी म्हणून 6 जून 2010 ला आलो. आठवडाभरातच मंद्रूपजवळील नांदणी पेट्रोलपंपावर 30 लाखांची चोरी झाली. चार तासांत हा गुन्हा उघडकीस आणून पैसे, चोरटे जेरबंद केले. यानंतर घरी आलो. त्यावेळी माझे वडील कामेश्वर प्रधान रांचीवरून आले होते. त्यांना या घटनेची माहिती दिल्यानंतर ‘तू चांगलं काम केलंस..आव्हान स्वीकारून काम करत जा, यश आपोआप मिळते,’ अशी प्ररेणादायी थाप वडिलांनी दिली आणि तीन वर्षे आठ महिने सोलापुरात चांगले काम केले. यात नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी यांचा मोठा वाटा आहे, अशा भावना पोलिस अधीक्षक राजेश प्रधान यांनी व्यक्त केल्या.


प्रधान यांची ठाणे येथे बदली झाली आहे. रविवारी बदलीचे वृत्त येताच अभिनंदनासाठी त्यांचा फोन वाजत होता. सायंकाळी त्यांच्याशी संवाद साधताना ते भावूक झाले होते. महिनाभरातच आषाढी वारी आली होती. नियोजन कसे होणार याचा अभ्यास करीत होतो. स्थानिक पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून माहिती घेऊन नियोजन केले. त्यातून नवी माहिती मिळत गेली. वाहतूक नियोजन, बंदोबस्त नियोजन करून चार आषाढी, चार कार्तिकी, चार माघी, तीन चैत्रवारींचा यशस्वी बंदोबस्त केला.


टेंभुर्णी दरोडा तपास थरारक
टेंभुर्णीजवळ गोळीबार करून 75 लाख लुटले. या टोळीचा तपास करताना थरारक अनुभव आले. आमच्या पथकाला आधुनिक पद्धतीने तपास करताना चोरांचा मुंबई गँगवॉरशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले. महाराष्ट्र, दिल्ली, बिहार या राज्यांतील तरुणांची टोळी जेरबंद केली. हा तपास माझ्यासाठी आव्हानात्मक होता, असे प्रधान म्हणाले. तसेच अवैध वाळू उपाशावर कारवाई करून 25 कोटींपर्यंत दंड वसूल केला.


या दोन गोष्टी राहून गेल्या
जिल्ह्यातील प्रत्येक दुचाकीची माहिती काढून त्यांची कागदपत्रे तपासणे, त्याची माहिती संकलित करून डाटा करण्याचा मानस होता.शाळा, कॉलेजात जाताना मुलींची होणारी छेडछाड रोखण्यासाठी आणखी सक्षम पथक नेमणे. प्रबोधन करण्यासाठी नियोजन केले होते.