आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज अलिबाबा, तर 40 चोर नाशकात - राजीव सातव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - ‘तोडफोडची भाषा करणारे सत्ता चालवू शकत नाहीत. अलिबाबा मुंबईत आहे आणि त्याचे चाळीस चोर नाशकात आहेत. राज ठाकरे यांनी प्रथम नाशिक मनपा सांभाळावी आणि नंतर महाराष्ट्राच्या सत्तेबाबत बोलावे,’ अशी टोलेबाजी अखिल भारतीय युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष राजीव सातव यांनी रविवारी केली.

सोलापुरातील युवक कॉँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते. तोडफोडीची भाषा करून हातवारे करणे, खोटे बोल, रेटून बोल हा ठाकरे प्रॉडक्शनचा कारभार आहे. तो आता थांबवायला हवा, कारण जनता आता यांच्या भूलपाथांना बळी पडणार नाही, असे प्रतिपादन सातव यांनी केले. सध्यासारखी परिस्थिती 2003 आणि 2009 मध्ये होती, परंतु सत्तेवर कॉँग्रेस पक्षच आला. ज्या अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी करून दाखवले नाही ते गुजरातचा ‘साताफेकू’ काय करून दाखवणार. जनता यांना कधीच माफ करणार नाही. बलिदानाची मूर्ती असलेल्या सोनिया गांधी यांच्याच पाठीशी जनता उभी राहणार, असे ठाम मत सातव यांनी व्यक्त केले.