आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजलक्ष्मी मृत्यूप्रकरणी आणखी दोघांचे जबाब; लिफ्टमधील मृत्यूप्रकरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - लिफ्टमध्ये अपघातात शाळकरी मुलगी राजलक्ष्मी शिंदेच्या मृत्यूप्रकरणी राज्य बांधकाम विभागाच्या लिफ्ट परवाना खात्याच्या पथकाने आणखी दोघांचे जबाब घेतले. दोन सदस्यांचे पथक रविवारी सोलापुरात आले होते. याआधीही याच विभागाने संकुलातील सर्व रहिवाशी व बांधकाम व्यावसायिक शहा यांचे जबाब घेतले.

खात्याचे साहाय्यक विद्युत निरीक्षक सुधीर राठोड, आणि आय. जे. धाबेराव यांनी वॉचमन आणि डॉ. मनगोळी यांचे जबाब नोंदवले. डॉ. मनगोळी यांचा दवाखाना या संकुलात आहे. जबाबानंतर अहवाल पूर्ण करून देणार असल्याचे राठोड यांनी सांगितले. या अहवालावरून पोलिसांना गुन्हे नोंदवण्याकामी सहकार्य होणार आहे. यावेळी फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे फौजदार एस.के. खटाणे उपस्थित होते. शिंदे हिचा दत्त चौकातील शाश्वत मॅजिस्टिक संकुलात लिफ्टमध्ये २० जुलैला मृत्यू झाला होता. त्याचा अहवाल येत्या दहा दिवसांत सादर होणार आहे.

या मुद्द्यांवर तपास
लिफ्ट लावण्यास परवाना, त्याचा वापर परवाना, बांधकाम परवाना आहे, इमारत वापर परवाना देताना महापािलकेने लिफ्ट वापर परवाना तपासला होता का, रहिवाशांच्या कागदपत्रांची पडताळणी, आदी मुद्द्यांवर तपास सुरू आहे.

आतापर्यंतची कारवाई
लिफ्ट विभागाने ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर शेवटच्या आठवड्यात संकुलातील रहिवासी, बांधकाम व्यावसायिक शहा व त्यांचे भागीदार यांना नोटीस बजावली होती. सात दिवसांच्या मुदतीनंतर सप्टेंबर उलटला तरी त्यांनी उत्तर दिलेले नाही. साहाय्यक विद्युत निरीक्षक सुधीर राठोड २७ सप्टेंबर रोजी येथे येऊन जबाब घेतला.

लवकरच अहवाल
राजलक्ष्मी मृत्यूप्रकरणी मी आणि आय. जे. धाबेराव साहेब आम्ही दोघे ५ ऑक्टोबर रोजी सोलापुरात आलो होतो. वॉचमन आणि डॉक्टर या दोघांचा लेखी जबाब घेतला. त्याशिवाय इतर काही तपास कामही पूर्ण झाले. लवकरच हा प्रश्न मागी लावून तपास अहवाल सादर करू.” -
सुधीर राठोड, लिफ्ट विभागाचे साहाय्यक विद्युत निरीक्षक, मुंबई